Main menu

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

यु टूब व्हिडीओ

मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन

Leadership Crucibles(109 MB) (MP4)



flogo1 img


Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005



  • प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त

    अमरावती विभागअमरावती

    या कार्यालयाची माहितीचा अधिकार

    २००५ अंतर्गत

    १ ते १७ बाबींची माहिती

     

    कार्यालयाचे नाव - प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अमरावती विभाग अमरावती

    पत्ता - प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अमरावती विभाग अमरावती तहसिल कार्यालय अमरावती जवळ, जोग चौक अमरावती पिन कोड ४४४६०१

    कार्यालय प्रमुख - डॉ.एस.जे.आगलावे, प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अमरावती विभाग अमरावती

    शाखा प्रमुख - १. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

    २. प्रशासकीय अधिकारी

    कार्यक्षेत्र - अमरावती विभागातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ (एकुण ५ जिल्हे)

    दुरध्वनी क्रमांक - ०७२१-२६७३३२५,०७२१-०७२१-२५६०५६७

    फॅक्स क्रमांक - ०७२१-२६७३३२५

    ई-मेल - rjcahamt@rediffmail.com

    कार्यालयीन वेळ - सकाळी १०.०० ते ५.४५ पर्यंत

    साप्ताहीक सुटी - रविवार आणि प्रत्येक महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार तसेच शासकीय राजपत्रात प्रसिध्द केलेल्या सर्व कार्यालयीन सुट्या

    (एकरचनाकार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

    प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अमरावती विभाग अमरावती या कार्यालयाची स्थापना दिनांक ०१ मे १९८४ ला झालेली

    आहे. या कार्यालयामार्फत विभागाअंतर्गत अमरावती/अकोला/वाशिम/बुलढाणा व यवतमाळ या पाच जिल्हयांमधील

    पशुसंवर्धन विषयक सर्व बाबींवर प्रशासकीय व तांत्रिक सनियंत्रण करण्यात येते. या कार्यालयाची रचना खालील प्रमाणे

    आहे.

    रचना-

    प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन अमरावती विभाग अमरावती या कार्यालयाचे कामकाज दोन शाखाप्रमुखांमार्फत चालते.

  • तांत्रिक व नियोजन विभाग

  • या विभागाचे प्रमुख सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन) हे असुन त्यांचे अधिपत्याखाली खालील प्रमाणे तीन शाखा आहेत या शाखेमार्फत शासनाकडुन/खात्याकडुन प्राप्त झालेली दैनंदिन पत्रव्यवहार पाहुन तांत्रिक, नियोजन, सांख्यिकी व वैरण शाखेसंबधी पत्रव्यवहार योग्य ती कार्यवाही करणे. जनमाहीती अधिकारी म्हणुन कार्य पार पाडणे. विभागात राबविण्यात येणा-या विविधयोजना-सर्वसाधारण, विशेष घटक, आदिवासीउपयोजना, ओ.टी.एस.पी, अनुशेष, अँस्कॅड योजना ईत्यादी योजनांचे सनियंत्रण ठेवणे. जिल्हयातील संस्थांकडुन प्राप्त झालेले औषधी/हत्यारे खरेदी व इतर आलेल्या प्रस्तावांची छाननी करुन वरीष्ठांकडे मंजुरीकरिता सादर करणे. विभागातील तांत्रिक कार्याचे मासिक/त्रैमासिक अहवाल खात्यास विहीत कालावधीत सादर करणेसाठी सनियंत्रण ठेवणे. विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक तसेच योजनांतर्गत योजनांचे ४/८/१० माही अंदाजपत्रके तयार करुन खात्यास सादर करणे. अस्थाई पदांचे प्रस्तावांची छाननी करुन खात्यास सादर करणे. तांत्रिक, नियोजन, सांख्यिकी व वैरण शाखेच्या अहवालांची तपासणी व छाननी करणे. स्वेच्छा निधीमधुन प्राप्त झालेल्या प्रस्तावांची छाननी करुन खात्यास सादर करणे. राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत पशुवैद्यकीय संस्थांचे बांधकामे/हत्यारे ईत्यादींचे प्रस्ताव संकलित करुन खात्यास सादर करणे. राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राचे अंदाजपत्रकाची पडताळणी करुन खात्यास सादर करणे. इत्यादी कामे केली जातात.

  • तांत्रिक शाखा

  • नियोजन शाखा

  • सांख्यिकी व वैरण शाखा

  • सदर शाखेत मंजुर पदांचा तपशील खालीलप्रमाणे

  • सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)-१ पद

  • पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)-१ पद

  • वैरण विकास अधिकारी- १ पद

  • सहाय्यक पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक-१)-१ पद

  • पशुधन पर्यवेक्षक (नियोजन)-१ पद

  • पशुधन पर्यवेक्षक (सांख्यिकी)-१ पद

  • क्रमांक २ प्रशासकीय विभाग

    या विभागाचे प्रमुख प्रशासकीय अधिकारी हे असुन त्यांचे अधिपत्याखाली खालीलप्रमाणे सात शाखा आहेत. या शाखेमार्फत प्रशासनिक संपुर्ण कामकाजावर देखरेख ठेवणे. प्राप्त झालेले टपाल उघडुन वर्गीकरण करणे व ते वरिष्ठांकडे अवलोकनार्थ सादर करणे. कर्मचा-याच्या उपस्थितीबाबत, लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे निर्धारणाचे कामकाज पार पाडणे, प्रशासकीय तपासणी, टेबल तपासणी करुन अहवाल तयार करणे व त्यासबंधीचा पत्रव्यवहार करणे. कर्मचा-याच्या कामकाजावर देखरेख ठेवुन त्यांच्याकडुन सादर होणा-या नस्तीवर प्रकरण तपासुन व अभिप्राय नोंदवुन वरिष्ठाकडे सादर करणे. कार्यालयातील प्रलंबित प्रकरणी खास मोहीम/धडक मोहीम हाती घेऊन कामाचा निपटारा अधिनस्त कर्मचा-याकडुन करुन घेणे. हजेरीपत्रावर उपस्थितीबाबत देखरेख ठेवणे. ले,।।-१,२,३ आस्था, सामान्य, आवकजावक शाखेच्या नस्त्या वरिष्ठाना सादर करुन, राजीन गांधी प्रशासकीय गतीमानता योजना बाबत पत्रव्यवहार करणे. खात्याने ठरवुन दिलेल्या जाबचार्ट प्रमाणे कर्तव्य व जबाबदा-या पार पाडणे इत्यादी कामे केली जातात.

  • प्रशासन-२ शाखा

  • गोपनीय शाखा

  • लेखा-१ शाखा

  • लेखा-२ शाखा

  • आस्थापना शाखा

  • सामान्य शाखा

  • आवक-जावक शाखा

  • सदर शाखेत मंजुर पदांचा तपशील खालीलप्रमाणे

  • प्रशासकीय अधिकारी-१ पद

  • अधिक्षक-१ पद

  • लघुलेखक (उच्चश्रेणी)-१ पद

  • वरीष्ठ सहाय्यक-२ पद

  • वरीष्ठ लिपिक-१ पद

  • कनिष्ठ लिपिक-२ पद

  •  

    कार्य व कर्तव्ये - मरावती विभाग अंतर्गत खात्याच्या पशुसंवर्धन विषयक विविध योजना राबविणे करिता नियंत्रण ठेवणे व अधिनस्त जिल्हया अंतर्गत राज्यस्तर/स्थानिकस्तर पशुवैद्यकीय संस्थांचे अधिकारी/कर्मचारी यांचे तांत्रिक व प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवणे. शासकीय योजनांचा/पशुवैद्यकीय सेवेचा लाभ विभागा अंतर्गत राज्यस्तर/स्थानिकस्तर पशुवैद्यकीय संस्थांव्दारे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे व शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कार्यवाही करणे.

     

    अमरावती विभागात कार्यरत असलेल्या पशुसंवर्धन खात्याच्या संस्था

    अं.क्र.

    संस्थचे/कार्यालयाचे नाव

    अमरावती

    अकोला

    वाशिम

    बुलढाणा

    यवतमाळ

    एकुण

    जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

    ०१

    ०१

    ०१

    ०१

    ०१

    ०५

    जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

    ०१

    ०१

    ०१

    ०१

    ०१

    ०५

    पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

    ०१

    ०१

    ००

    ०१

    ०१

    ०४

    तालुका घु पशुवैद्यकीय सर्वचिकीत्सालय

    ०६

    ०५

    ०४

    ०६

    ०७

    २८

    जिल्हा कृत्रिम रेतन केंद्रे

    ०१

    ०१

    ००

    ०१

    ०१

    ०४

    विभागीय रोग अन्वेषण प्रयोग शाळा

    ००

    ०१

    ००

    ००

    ००

    ०१

    शासकिय कुक्कुट प्रकल्प

    ०१

    ०१

    ००

    ००

    ०१

    ०३

    पशुवैद्यकीय दवाखाने श्रे-१

    राज्यस्तर

    स्थानिकस्तर

    एकुण

     

     

     

    २८

    ४०

    ६८

     

     

     

    ००

    २७

    २७

     

     

     

    ००

    १५

    १५

     

     

     

    ००

    ३३

    ३३

     

     

     

    ००

    ४७

    ४७

     

     

     

    २८

    १६२

    १९०

    पशुवैद्यकीय दवाखाने श्रे-२

    राज्यस्तर

    स्थानिकस्तर

    एकुण

     

     

     

    ३२

    ५९

    ९१

     

     

     

    ००

    ४०

    ४०

     

     

     

    ००

    ४१

    ४१

     

     

     

    ००

    ८९

    ८९

     

     

     

    ००

    १३७

    १३७

     

     

     

    ३२

    ३६६

    ३९८

    १०

    फिरते पशुवैद्यकीय दवाखाने

    ०२

    ०१

    ००

    ०२

    १२

    १७

    ११

    तपासणी नाके

    ०३

    ००

    ००

    ००

    ००

    ०३

     

    एकुण संस्था

    १७५

    ७९

    ६२

    १३४

    २०८

    ६५८

    वरील पशुवैद्यकीय संस्थांमार्फत आजारी पशुधनाला औषधोपचार, बेरड वळुंचे खच्चीकरण, विविध रोग प्रतिबंधक लसीकरण, कृत्रिम रेतनाव्दारे संकरित गोपैदास कार्यक्रम ईत्यादी सेवा पुरविण्यात येतात. तसेच कुक्कुटपालन, शेळीपालन व दुग्धव्यवसाय यासारखे शेतीपुरक व्यवसाय तांत्रिकदृष्टया करण्याकरिता सुशिक्षित बेरोजगारांना प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे विविध योजनेअंतर्गत तलंगा गट वाटप, शेळी गटवाटप, सुधारीत जातीच्या संकरित कालवडीची व म्हशीच्या पारड्यांची जोपासना करण्यात येते. वैरण विकास योजनेअंतर्गत सुधारीत चा-याची पिके घेण्याकरिता बियाणे व रोपे अनुदानावर वाटप करण्यात येते.

    (दोनअधिकारीकर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्य

    प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त अमरावती विभाग अमरावती यांचे अधिकार व कर्तव्य-

  • प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त हे पद विभागाचे विभाग प्रमुख म्हणुन घोषित असुन विभागाअंतर्गत येणा-या अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या पाच जिल्हयांसाठी खात्यांसंबधीचे कामकाजाबाबत प्रशासकीय आर्थिक व तांत्रिक बाबीवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार या पदास आहेत.

  • विभागाच्या योजना संबधी तांत्रिक व वित्तीय मंजुरी देणे.

  • विभागातील सर्व संस्थाना भेटी देवुन तांत्रिक व प्रशासकीय निरिक्षण करणे व मार्गदर्शन करणे.

  • जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्हास्तरावर जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध योजनांचे संनियंत्रण ठेवुन तांत्रिक मंजुरी देणे.

  • विभागातील जनावरांचे स्वास्थ उपचार कार्य नियंत्रण व अमंलबजावणी करणे.

  • विभागातील औषधी व अवजारे ईत्यादीना तांत्रिक मंजुरी प्रदान करणे.

  • पशुसंवर्धन विषयक विविध योजनांना तांत्रिक मान्यता प्रदान करणे.

  • विभागात उच्च प्रतिच्या जास्त दुध उत्पादन देणारे गाईची कृत्रिम रेतनाव्दारे निर्मिती करुन सनियंत्रण करणे.

  • विभागातील संसर्गजन्य आजार व लसीकरण कार्य सनियंत्रित करुन अमलबजावणी करणे.

  • विभागातील सर्व जिल्हयामधील सर्व संस्थाना भेटी देऊन तांत्रित कामाची अमलबजावणी करणे.

  • दर पाच वर्षानी पशुगणनाबाबत आवश्यक आखणी करुन पशुसंवर्धन विषयक योजना राबविणे.

  • विभागातील पशुपैदास पक्षेत्र, शेळी, मेंढी फार्म व कुक्कुट प्रकल्पांना मार्गदर्शन करणे.

  • विभागातील सर्व जिल्हयांच्या मागणीनुसार चारा उत्पादनासाठी वैरण बियाण्याची उत्पादकता पशुपालकामध्ये जागृतीचे नियोजन करणे.

  • विभागातंर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, सहायक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी (राज्यस्तर) यांच्या रजा मंजुर करणे.

  • विभागातंर्गत शासनाच्या धोरणाप्रमाणे वर्ग-४ पदावरील कर्मचा-यांना नियुक्ती देणे.

  • विभागातील अधिकारी/कर्मचारी यांचेवर प्रशासकीय नियंत्रण ठेवणे.

  • विभागाअंतर्गत जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे अधिनस्त राज्यस्तरीय संस्था तसेच जिल्हा परिषदेतील संस्था व जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात आलेल्या राज्यस्तरीय संस्थांची १० टक्के पडताळणी करणे व यासाठी महिन्यातुव १० दिवस दौरा करणे आवश्यक आहे.

  • खात्याअंतर्गत संस्थांवा नियमित ३ व अचानक ५ भेटी देणे.

  • जिल्हा परिषद संस्थांना नियमित ३ व अचानक २ भेटी देणे.

  • १२ प्रशासकीय तपासणी करणे.

  • रोख रक्कमेची पडताळणी करणे.

  • पंचायत समितींना १५ भेटी देणे.

  • ग्रामपंचायतींना १० भेटी

  • विविध योजनेअंतर्गत वाटप केलेल्या दुधाळ जनावरांची/शेळी गटांची १० टक्के पडताळणी करणे.

  • पशुवैद्यकीय संस्थांना दिलेले तांत्रिक कार्याचे उदिष्टे व साध्य याबाबत आढावा घेणे व दिलेले उदिष्टे १०० टक्के पुर्ण होण्याच्या दृष्टीने तांत्रिक मार्गदर्शन करणे.

    खात्याचे लेखा परिक्षण/महालेखापाल यांचे लेखापरिक्षण मुद्यांच्या अनुपालनावर प्रादेशिक स्तरावरचे अभिप्राय देणे तसेच लेखा आक्षेप निकाली काढण्याचे दृष्टीकोनातून विभागीय स्मरावरील सभेत आढावा घेणे.

    सेवा विषयक बाबी, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, न्यायालयीन प्रकरणे ईत्यादीचा निपटारा करणे.

    शासनाचामार्फत/पशुसंवर्धन खात्यामार्फत विविध योजनांचा प्राप्त झालेला निधी कॅशफ्लोनुसार खर्च करणे बाबत अधिनस्त कार्यालय प्रमुखांना व अंमलबजावणी अधिका-यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणे व खर्चाचा आढावा घेणे.

     

    (पाच) कर्मचा-याकडे असलेले किंवा त्यांचे नियंत्रणात असलेले किंवा त्यांचे कार्य पार पाडणेसाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडुन वापरण्यात येणारे नियम विनियम सुचना, नियम पुस्तिका आणि अभिलेख –

    या विभागातील राज्यस्तरीय व जिल्हा परिषद संस्थेत कार्यरत असलेले अधिकारी/कर्मचारी खालील नियम पुस्तिकेचा आधार घेऊन शासकीय कामकाज पार पाडण्याची कार्यवाही करतात.

    1. म.ना.से. रजा नियम १९८१

    2. म.ना.से. वेतन नियम १९८१

    3. म.ना.से. सेवेच्या सर्वसाधारण शर्ती १९८१

    4. म.ना.से. निवृत्ती वेतन १९८१

    5. म.ना.से. प्रवास भत्ता नियम १९८१

    6. महाराष्ट्र सर्वसाधारण भनिनि १९६६

    7. आकस्मिक खर्चाचे नियम १९६५

    8. महाराष्ट्र जिल्हा परिषदसेवा प्रवेश नियम १९६७

    9. शिस्त व अपील नियम १९६४

    10. पंचायत समिती अधिनियम १९६१

    11. महाराष्ट्र वित्तीय नियम १५/०५/२००९

  •  

    (सहा) कर्मचारी/अधिकारी यांचेकडे असलेल्या किंवा त्यांचे नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या वर्गाचे विवरण -

    कार्यालयीन कामकाजात खालीलप्रमाणे सहा गठ्ठे पध्दतीचा वापर करण्यात येतो.

  • कार्यविवरण पंजी/प्रलंबित पत्रे

  • प्रतिशाधीन प्रकरणे

  • स्थायी आदेश नस्ती

  • नियतकालीके अ व ब

  • अभिलेख कक्षात पाठवयाच्या नस्त्या

  • ड वर्गीय कागदपत्रे

    1. कार्यविवरण पंजी/प्रलंबित पत्रे – प्रत्येक शाखा प्रमुखाकडुन प्रपत्र-६ मध्ये कार्यविवरण नोंदवही ठेवणे आवश्यक असुन या नोंदवहीत दैनदीन टपालाची नोंद घेऊन प्रकरणाचा निपटारा इ. झाल्यानंतर कार्यविवरण नोंदवहीत पत्राचा अनुक्रमांक गोल करुन प्रकरणे निकाली काढुन ते जावक शाखेत पाठवुन स्तंभ चारमध्ये ते निकाली काएल्याची नोंद घेऊन कार्यविरण नोकंदवही दर आठवडयाचा गोषवारा कडुन प्रभारी अधिकारी यांचेसमोर ठेवावा.

    2. प्रतिक्षाधीन प्रकरणे – या नोकंदवहीमध्ये वरिष्ठ कार्यालयाकडुन माहीती प्रलंबित आहेत व प्रकरण निकाली निघु शकत नाही अशी प्रकरणे प्रतिक्षाधीन नोंदवही नोंदविण्यात यावी.

    3. स्थायी आदेश नस्ती – या नोंदवहीत शासनाचे/खात्याचे शासन निर्णय परिपत्रक कायमस्वरुपी जतन करुन ठेवले जातात व याचा उपयोग वेळोवेळी कार्यालयीन कामकाजात घेतला जातो. ही नस्ती विषयावर ठेवुन त्यास अनुक्रमाणिका देलेली असावी.

    4. नियतकालीके अ व ब – या नोंदवहीच्या भाग अ मध्ये मासीक, त्रेमासीक, सहामाही, वार्षिक पंधरवाडी अहवाल ज्या पत्रान्वये विहीत करण्यात आले आहे व ज्या कार्यालयास असा अहवाल विहीत केलेल्या दिनांकास सादर करावयाचा आहे त्यांचे पत्र क्रमांक व दिनांकासह नोंद घेण्यात येते व भाग ब मध्ये ज्या दिनांकास असा अहवाल प्रत्यक्षात सादर करण्यात अबाला त्यबाबतची नोंद ठेवण्यात येते.

    5. अभिलेख कक्षात पाठवावयाच्या नस्त्या – ज्या प्रकरणाची कार्यवाही पुर्ण झाली आहे अशी प्रकरणे अबभिलेख कक्षात पाठविण्यापुर्वी या अभिलेख्याचे अ,ब,क,ड असे वर्गीकरण करुन नसत्या/प्रकरणे अभिलेख कक्षात पाठविण्यात येतात. अभिलेख कक्षाचे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे.

  •  

    अ.क्र.

    अभिलेख्याचा वर्ग

    वापरावयाच्या बस्त्यचा रंग

    जतन करुन ठेवण्याचा कालावधी

    लाल

    कायमस्वरुती

    पिवळा

    तिस वर्ष

    हिरवा

    दहा वर्ष

    क-१

    निळा

    पाच वर्ष

    पांढरा

    एक वर्ष

    1. ड वर्गीय कागदपत्रे – जी पत्रे केवळ माहीतीसाठी प्राप्त होतात किंवा ज्या पत्रावरील कार्यवाही पुर्ण झालेली आहे व ज्या कागदपत्रांना एक वर्षावरील कालावधीसाठी राखुन ठेवण्याची आवश्यकता नाही अशी कागदपत्रे जसे मासीक अहवाल, किरकोळ रजा ईत्यादी ड वर्गीय कागदपत्रे म्हणुन एक वर्षाच्या कालावधीसाठी राखुन ठेवण्यात येतात व एक वर्षानंतर सक्षम अधिका-याची मंजुरी घेऊन नष्ट केली जातात.

  •  

    (सात) धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संबधात लोकांशी विचार विनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडुन निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा तपशिल –

    पशुसंवर्धन खात्याच्या विविध योजना राबविण्याचे धोरण खातेस्तरावर किंवा शासन स्तरावर ठरविले जाते. विभागाअंतर्गत सर्व पशुवैद्यकीय संस्थांच्या दर्शनिय भागावर ग्रामस्थांची सनद अंतर्गत संबधित संस्थेची संपुर्ण माहीती प्रदर्शित केली आहे. प्रत्येक स्थानिक स्तरीय संस्थेत पशुसुधार समितीची स्थापना करण्यात येते. खात्याच्या विविध योजना व खात्यामार्फत राबविण्यात येत असलेले सर्व तांत्रिक कामे यांची माहीती तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी विस्तार यांचेमार्फत सर्वसामान्य जनतेला पुरविण्यात येते. जिल्हास्तरावर ह्याबाबत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त गोपालकांना मार्गदर्शन करुन त्यांच्या अडीअडचणी सोडविण्याकरीता मदत करतात. पशुसंवर्धन खात्याकडुन देण्यात येत असलेल्या सेवांबाबत काही अडचणी/तक्रारी असल्यास त्या नोंदविण्याकरीता प्रत्येक पशुवैद्यकीय श्रेणी-१/ श्रेणी-२ दवाखान्यामध्ये तक्रार पुस्तिका ठेवण्यात येते.

    (आठ) कार्यालयाच्या अधिकारी/कर्मचा-याचा एक भाग म्हणुन किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणुन घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तीच्या मिळुन बनलेल्या मंडळाचे, परिषदाचे, समित्याचे, आणि अन्य निकायांचे विवरण, आणि त्या मंडळाच्या परिषदांच्या, समित्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकासाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीचे कार्यवृत्ते जनतेला पाहावयास मिळण्याजोगी आहे किंवा कसे याबाबतचे विवरण –

     

    या विभागाचे कामाकाजाबाबत ही बाब लागु नसल्यामुळे माहीती निंरक आहे.

     

    (नऊ) अधिका-यांची/कर्मचा-याची निर्देशिका –

    अ.क्र.

    अधिकारी/कर्मचा-याचे नांव व पदनाम

    कार्यालयाचा पत्ता

    शेरा

    डॉ. एस.जे.आगलावे, सहआयुक्त पसं.

    प्रा.स.आ. अमरावती

     

    डॉ. एस.एस. गोरे, सहा. आयुक्त

    प्रा.स.आ. अमरावती

     

    डॉ. सी.जी. गीरी, प.वि.अ.

    प्रा.स.आ. अमरावती

     

    श्री. न.हे. गोखे, प्रशासन अधिकारी, प्रभारी

    जि.प.उ.आ. अमरावती

    रिक्त पद

    श्री. डी.एस. मोरे, अधिक्षक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    श्री. एम.एन. पंचभाई, उ.श्रे. लघुलेखक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    श्री. पी.के. सरदार, वरिष्ठ सहायक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    वरिष्ठ सहायक

    प्रा.स.आ. अमरावती

    रिक्त पद

    श्री. आर.एस.पाटील, सपविअ

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १०

    श्री. पी.एल. भोपळे, प.प.

    प्रा.स.आ. अमरावती

     

    ११

    श्री. ए.बी.चौहाणे, प.प.

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १२

    श्री. एस.जी. फुलबांधे, वरिष्ठ लिपीक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १३

    श्री. डी.डी. गांजरे, कनिष्ठ लिपीक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १४

    श्रीमती एन.एम. चोरे, कनिष्ठ लिपीक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १५

    श्री. बी.एम. नेवारे, वाहनचालक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १६

    श्री. ए.डब्यु. बिसने, नाईक

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १७

    श्री. व्ही.एम. भुताडे, शिपाई

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १८

    श्री. आसर.सी. सदार, शिपाई

    प्रा.स.आ. अमरावती

     

    १९

    श्रीमती नर्मदाबाई शं. विघ्ने, शिपाई

    प्रा.स.आ. अमरावती

     

     

    वर्ग-१ व वर्ग-२ चे अधिका-यांची नियुक्ती राज्यशासनाद्वारे केली जाते. व या संवर्गाची जेष्ठता सुची शासनस्तरावरुन खात्यामार्फत प्रसिध्द केली जाते. वर्ग-३ ची नियुक्ती खातेस्तरावरुन होत असुन त्यांच सेवाजेष्ठता सुचित आयुक्त पशुसंवर्धन स्तरावरुन प्रसिध्द करण्यात येते. वर्ग-४ कर्मचा-याची नियुक्ती शासन नियमाप्रमाणे या स्तरावर करण्यात येऊन त्यांची सुची या स्तरावरुन प्रसिध्द करण्यात येते.

    (दहा) विभागीय कार्यालयातील प्रत्येक अधिका-याला व कर्मचा-याला मिळणारे मासीक वेतन, तसेच प्राधीकरणाच्या विनिनियमामध्ये तरतुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याच्या पध्दची –

    अ.क्र.

    अधिकारी/कर्मचा-याचे नाव व पदनाम

    स्थायी/अस्थायी

    सहाव्या वेतन आयोगाप्रमाणे सध्याचे वेतन मुळ वेतन+ग्रेड पे

    माहे जुलै ०९ चे एकुण वेतन

    डॉ. एस.जे.आगलावे, सहआयुक्त

     

    अस्थायी

    ३३१८०/-

    ४१०००/-

    डॉ. एस.एस. गोरे, सहा. आयुक्त

    अस्थायी

    ३०६७०/-

    ४०७८९/-

    डॉ. सी.जी. गीरी, प.वि.अ.

    अस्थायी

    २८७७०/-

    ३८३४७/-

    प्रशासन अधिकारी

    रिक्त पद

     

     

    श्री. डी.एस. मोरे, अधिक्षक

    अस्थायी

    १९६७०/-

    २५६९१/-

    सौ. एम.एन. पंचभाई, उ.श्रे. लघुलेखक

    अस्थायी

    २३१९०/-

    ३०७९५/-

    श्री. पी.के.सरदार, वरिष्ठ सहायक

    स्थायी

    १६१३०/-

    १९८७४/-

    वरिष्ठ सहायक

    रिक्त पद

     

     

    श्री. आर.एस.पाटील, सपविअ

    अस्थायी

    १५७३०/-

    २०५९९/-

    १०

    श्री. पी.एल. भोपळे, प.प.

    अस्थायी

    १५७७०/-

    २०६४७/-

    ११

    श्री. ए.बी. चौहाणे, प.प.

    अस्थायी

    १५२४०/-

    २०१९४/-

    १२

    श्री. एस.जी. फुलबांधे, वरिष्ठ लिपीक

    अस्थायी

    १३८१०/-

    १८३०३/-

    १३

    श्री. डी.डी. गांजरे, कनिष्ठ लिपीक

    स्थायी

    ९७७०/-

    १२९८४/-

    १४

    श्रीमती एन.एम. चोरे, कनिष्ठ लिपीक

    अस्थायी

    ७७३०/-

    १०२५७/-

    १५

    श्री. बी.एम. नेवारे, वाहनचालक

    स्थायी

    ९७९०/-

    ११८८४/-

    १६

    श्री. ए.डब्यु. बिसने, नाईक

    स्थायी

    ९८००/-

    १२७९६/-

    १७

    श्री. व्ही.एम. भुताडे, शिपाई

    स्थायी

    ९६४०

    ११७०१/-

    १८

    श्री. आर.सी.सदार, शिपाई

    स्थायी

    ८८५०/-

    ११५२४/-

    १९

    श्रीमती नर्मदाबाई शं. विघ्ने, शिपाई

    स्थायी

    ८५९०/-

    १११५४/-

     

       
     

    अ.क्र.

    अधिकारी/कर्मचारी यांचे नाव व पदनाम

    कामाचा तपशिल

    डॉ. एस.एस.गोरे

    सहायक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन)

    तांत्रिक, नियोजन शाखेतील अधिकारी/कर्मचारी यांचे कामावर नियंत्रण ठेवणे. पंतप्रधान पॅकेज, मुख्यमंत्री पॅकेज व विदर्भ पॅकेज व त्याअनुषंगाने अहवाल व पाठपुरावा करणे, विभागातील योजना अंतर्गत योजनेचे नियोजन व नियंत्रण तसेच योजना अंतर्गत योजनेच्या खर्चावर नियंत्रण ठेवुन पाठपुरावा करणे. नियोजन विभागाचे आयोजित सभेला हजर राहणे.

    तांत्रिक/नियोजन शाखेतील मासिक/त्रैमासिक/वार्षिक अहवाल वेळेवर सादर होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे. औषध खरेदी, द्रवनत्र खरेदी साध्न सामुग्री खरेदी ईत्यादी बाबीचे नियंत्रण ठेवुन पाठपुरावा करणे व तांत्रिक शाखेतील निविदेबाबतची कार्यवाही करणे. माहितीच्या अधिकाराबाबत वेळीच कार्यवाही करुन व त्या अनुषंगाने नोंदवही ठेवुन पत्रव्यवहार करणे व अहवाल सादर करणे. विभागाचे कार्यक्रम अंदाजपत्रक तसेच योजनांतर्गत योजनांचे ४/८/१० माहीअंदाजपत्रक तयार करुन खात्यास सादर करणे.

    डॉ. सी.जी.गीरी,

    पशुधन विकास अधिकारी (ता)

    तांत्रिक शाखेतील कर्मचा-यावर कामकाजाचे नियंत्रण व देखरेख ठेवणे, त्यांच्याकडुन सादर होणा-या प्रकरणावर प्रकरण तपासुन अभिप्राय नोंदवुन वरिष्ठाकडे सादर करणे. पंतप्रधान पॅकेज, मुख्यमंत्री पॅकेज, अंतर्गत प्रकरणे हाताळणे व त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करुन अहवाल सादर करणे व त्यांच्या नोंदी ठेवणे, औषधी खरेदी, द्रवनत्र खरेदी, निर्लेखन मंजुरी ईत्यादी बाबत पाठपुरावा ठेवणे, प्राप्त झालेल्या ईमेलसंबधी माहिती संबधीत शाखांना देऊन कार्यवाही करुन घेणे व पाठपुरावा ठेवणे व ईमेल सतत सुरु ठेवण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे. विभागातील तांत्रिक कार्य, पशुउपचार, वधत्व, तपासणी, कृत्रिम रेतन, शस्त्रक्रिया, गर्भतपासणी ईत्यादी अहवाल व संनियंत्रण करणे. विधानसभा तारांकीत/अतारांकीत प्रश्नाची उत्तरे संकलीत करणे.

    श्री. एन.एच. गोखे,

    प्रभारी प्रशासकीय अधिकारी

    आहरण व संवितरण अधिकारी म्हणुन संपुर्ण कामे करणे. जिल्हा परिषदेकडील निधार्रण करणे. विभागाचे अंदाजपत्रक तयार करुन खात्यास सादर करणे. कोर्टकेस प्रकरणी अभिप्राय तयार करुन पाठपुरावा करणे. प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी पार पाडणे. कार्यालयाची व अधिनस्थ प्रशासकीय तपासणी करणे.

    श्री. डी.एस. मोरे,

    अधिक्षक

    प्रशासनिक संपुर्ण कामकाजावर देखरेख ठेवणे. प्राप्त झालेले टपाल उघडुन वर्गीकरण करणे व ते वरिष्ठाकडे अवलोकनार्थ सादर करणे. कर्मचा-याच्या उपस्थितीबाबत, लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडणे. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे निर्धारणाचे कामकाज पार पाडणे, प्रशासकीय तपासणी, टेबल तपासणी करुन अहवाल तयार करणे व त्यासबंधीचा पत्रव्यवहार करणे. कर्मचा-याच्या कामकाजावर देखरेख ठेवुन त्यांच्याकडुन सादर होणा-या या नस्तीवर प्रकरण तपासुन व अभिप्राय नोंदवुन वरिष्ठाकडे सादर करणे. कार्यालयातील प्रलंबित प्रकरणी खास मोहीम/धडक मोहीम हाती घेऊन कामाचा निपटारा अधिनस्त कर्मचा-याकडुन करुन घेणे. हजेरीपत्रकावर उपस्थितीबाबत देखरेख ठेवणे. लेखा-१,२,३ आस्था, सामान्य, आवकजावक शाखेच्या नस्त्या वर अभिप्राय नोंदवुन वरिष्ठाना सादर करणे. राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता योजना बाबत पत्रव्यवहार करणे. खात्याने ठरवुन दिलेल्या जॉबचार्ट प्रमाणे कर्तव्य व जबाबदा-या पार पाडणे. तसेच वरिष्ठांनी सोपविलेली कामे पार पाडणे.

    सौ. एम.एन. पंचभाई,

    उच्च श्रेणी लघुलेखक

    गोपनिय अहवाल संकलीत करुन गोपनिय अभिलेखे ठेवणे. विभागीय चौकशीचे प्रकरणे हाताळणे. आयोजित सभेचे ईतिवृत्त तयार करणे. गोपनिय टपाल याबाबत आवक-जावक नोंदवहया ठेवुन विभाग प्रमुखाकडे अवलोकनार्थ सादर करणे.

    श्री. पी.के. सरदार,

    वरिष्ठ सहायक

    लेखा-१

    अर्थसंकल्पीय वार्षिक, चारमाही, आठमाही, दहामाही अंदाजपत्रक तयार करणे व त्या अनुषंगाने पत्रव्यवहार करणे व नोंदवहया ठेवणे, जिल्हा परिषदेकडील निर्धारणाचे कामकाज पार पाडणे व पत्रव्यवहार हाताळणे लेखा विषयक मासीक, त्रैमासीक, सहामाही, वार्षिक अहवाल तयार करुन सादर करणे. मोटार-कार संगणक, घर बांधणी, मोटार-सायकल, सायकल, अग्रीमाची प्रकरणे हाताळणे तथा पत्रव्यवहार करणे व नोंदवहया अदयावत ठेवणे कार्यालयातील/अधिनस्त कार्यालयाची वैधकीय प्रतिपुर्तीची मंजुरी प्रकरणे हाताळणे. लेखा परिक्षण विषयक प्रकरणे हाताळणे व त्याअनुषंगाने नोंदवहया अदयावत ठेवणे. खात्याचे/महालेखापाल यांचे लेखापरिक्षण बाबत पाठपुरावा करणे. अंतिम ना मागणी ना-चौकशी प्रमाणपत्र निर्गमित करण्याची कार्यवाही करणे. कालबाहय वेतन, प्रवास भत्ते देयके त्यास मंजुरी देणे व पत्रव्यवहार करणे, गटविमा योजनेअंतर्गत विमा निधी व बचत निधी मंजुरीची कार्यवाही करणे.

    श्री. डी.डी. गांजरे,

    कनिष्ठ लिपीक,

    (सामान्य शाखा अतिरीक्त कार्यभार)

    कार्यालयातील भांडार खरेदी, लेखन सामुग्री, उपयोगी साहित्य याची खरेदी करुन त्यांच्या नोंदवही ठेवणे, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन नोंदवही ईमेलसाठी लागणारी साधन सामुग्रीची खरेदीची कार्यवाही करुन पाठपुरावा करणे. कार्यालयातील भांडार सांभाळणे व त्याची नोंदवही ठेवुन पत्रव्यवहार हाताळणे, वाहनाची दुरुस्ती व देखभाल करुन त्यासाठी लागणा-या साहीत्याची खरेदी करुन नोंदवहया अदयावत ठेवणे. अधिनस्म कार्यालयाकडुन साहीत्य खरेदी, लेखन सामुग्री व वाहनासंबधीचे साहीत्य मंजुरीबाबत कार्यवाही करणे, कार्यालयासाठी लेखन सामुग्री मागणीपत्रक तयार करुन त्याचा पत्रव्यवहार करणे निरुपयोगी साहीत्य निर्लेखित व मंजुरीबाबत कार्यवाही करणे. भविष्य निर्वाह निधी, परतावा, नापरतावा अग्रीम मंजुरी प्रकरणे हाताळणे, राजीव गांधी अभियान व थकीत प्रकरणाचा निपटा याबाबत कार्यवाही करणे.

    श्री. एस.जी. फुलबांधे,

    वरिष्ठ लिपीक, आस्थापना

    वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंतच्या अधिकारी/कर्मचारी यांचे सेवापुस्तक व त्या अनुषंगाने सेवाविषयक सर्व बाबी हाताळणे व त्या अनुषंगीक नोंदवहया ठेवणे. वर्ग-१ वर्ग-४ पर्यंतच्या सेवाविषयक बाबी संबधी मासीक/त्रैमासीक/सहामाही/वार्षिक अहवाल तयार करुन सादर करणे. वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंतच्या अधिकारी/कर्मचारी वृदांचे बदली प्रकरण/परिविक्षा कालावधी/वेतननिश्चिती/नेमणुक/दक्षतारोध/कालबध्द पदोन्नती ई. सेवाविषयक बाबी हाताळणे. वर्ग-१ ते वर्ग-४ पर्यंतच्या सेवानिवृत्ती विषयक प्रकरणे हाताळणे , व सेवानिवृत्ती प्रकरणाचा निपटारा होण्याच्या दृष्टीने पाठपुरावा करणे. अन्य आस्थापनाविषयक कामे पार पाडणे.

    श्री. डी.डी. गांजरे,

    कनिष्ठ लिपीक,

    लेखा-२

    वेतन देयके, आकस्मिक खर्चाची देयके, एनपीडीसी देयके, भ.नि.नि., प्रवास भत्ता देयके तयार करुन व तपासुन कोषागारात टाकणे, मासीक खर्चाचे जमा/अहवाल तयार करणे व पत्रव्यवहार करणे, वर्ग-४ कर्मचारी भनिनि चे लेखे अद्यावत ठेवणे त्यासंबधीचे अहवाल वरिष्ठांना पाठविणे कार्यालयातील टेलीफोन, विद्युत खर्च, इंधन खर्च, मुद्रांक खर्च इत्यादी बाबतची मंजुरी बाबतची कार्यवाही करुन नोंदवहया अद्यावत ठेवणे, जमानत बंध पत्रव्यवहार नोंदवही ठेवणे, वेतन/प्रवास अग्रीमाच्या प्रकरणाची कार्यवाही करणे. हिंदी, मराठी, भाषा लेखा परिक्षा सुट मिळणेबाबतची प्रकरणे हाताळणे. अतिरिक्त मंजुरीची प्रकरणे, अतिरिक्त कार्यभार, किरकोळ रजा, ई. कामे सांभाळणे.

    १०

    श्री. बी.सी. पापळीकर,

    वरिष्ठ लिपीक, लेखा-३

    रोकड सांभाळणे, त्या अनुषंगाने नोंदवहया ठेवणे व पत्रव्यवहार करणे, कोषागर व बॅंकेची कामे हाताळणे व लेखाविषयक पत्रव्यवहार करणे. रोख नोंदवही अद्यावत ठेवणे.

    ११

    श्रीमती एम.एन. चोरे,

    कनिष्ठ लिपीक,

    आवक-जावक शाखा

    प्राप्त होणा-या टपालच्या आवक नोंदवहीत नोंदी घेणे, संबधीत शाखेला वाटप करणे, बाहेर पाठविण्यात येणा-या पत्राची जावक नोंदवहीत नोंद घेवुन पत्र पाठविण्याची कार्यवाही करणे, टपाल खर्च नोंदविणे मुद्राक नोंदवही अद्यावत ठेवणे, अर्धशासकीय पत्राची नोंदी घेणे व संबधीत शाखेला वाटप करणे.

    १२

    श्री. आर.एस. पाटील,

    स.प.वि.अ.

    (तांत्रिक शाखा-१

    औषध खरेदी, द्रवनत्र खरेदी, मंजुरीची प्रकरणे हाताळणे व त्यासंबधीचा पत्रव्यवहार, विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची दौरादैनदीनी मंजुरीची प्रकरणे व पत्रव्यवहार हाताळणे, तांत्रिक शाखेतील विविध निविदाबाबत पत्रव्यवहार हाताळणे व पाठपुरावा करणे, नैसर्गिक आपत्ती व त्याअनुषंगाने पत्रव्यवहार करणे. एन.सी.डी.सी. संबधीचे पत्रव्यवहार करणे.

    १३

    श्री. पी.एल. भोपळे,

    पशुधन पर्यवेक्षक, (नियोजन)

    विभागाचे वार्षिक नियोजन आठमाही, चारमाही इ. संबधी प्रकरणे हाताळणे. योजना अंतर्गत योजनावर नियंत्रण ठेवुन अहवाल सादर करणे, पुर्ननियोजनाचे प्रस्ताव व पत्रव्यवहार करणे, नियोजन विभागाचे मासीक, त्रेमासीक, सहामाही, वार्षिक अहवाल संकलीत करुन खात्यास सादर करणे. लससाठा नोंदवही ठेवणे त्यासंबधीचा पत्रव्यवहार करणे. अस्थाई पदाबाबत पत्रव्यवहार करुन मंजुरीबाबतचे प्रकरणे सादर करणे.

    १४

    श्री. ए.बी. चौहाण,

    पशुधन पर्यवेक्षक,

    (सांख्यिकी व वैरण शाखा)

    विभागातील के.एफ.एउ. चा वार्षिक प्रशासन अहवाल तयार करणे, संकलन करणे, कृत्रिम रेतम अहवाल. मासीक अहवाल कत्तलखाना अहवाल कत्तलखाना प्रमाणपत्र प्राप्त करण्याची कार्यवाही करणे त्याचा हिशोब नोंदवहया ठेवणे, सांख्यिंकी अहवाल, वैरण विकासाबाबत अहवाल, चाराटंचाई इ. पत्रव्यवहार हाताळणे व इतर अहवाल संकलीत करुन वरिष्ठांना पाठविणे व पाठपुरावा करणे.

    १५

    श्री. एम.बी. नेवारे,

    वाहन चालक

    वाहन सुस्थितीत ठेवणे व त्याची देखभाल करणे.

    १६

    श्री. ए.डब्ल्यु. बिसने, नाईक

    कार्यालयाचे आदेशित केल्याप्रमाणे व नमुन दिल्याप्रमाणे दैनदिनी कार्यालयीन कामे पार पाडण्यात येतात.

    १७

    श्री. व्ही.एम. भुताडे, शिपाई

    कार्यालयाचे आदेशित केल्याप्रमाणे व नमुन दिल्याप्रमाणे दैनदिनी कार्यालयीन कामे पार पाडण्यात येतात

    १८

    श्री. आर.सी. सदार, शिपाई

    कार्यालयाचे आदेशित केल्याप्रमाणे व नमुन दिल्याप्रमाणे दैनदिनी कार्यालयीन कामे पार पाडण्यात येतात

    १९

    श्रीमती नर्मदाबाई शं. विघ्ने, शिपाई

    कार्यालयाचे आदेशित केल्याप्रमाणे व नमुन दिल्याप्रमाणे दैनदिनी कार्यालयीन कामे पार पाडण्यात येतात

    (तीन) निर्णय घेण्याच्या प्रक्रीयेत अनुसरण्यात येणारी कार्यपध्दती तसेच पर्यवेषण आणि उत्तरदायीत्व -

    या विभागातंर्गत अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या पाच जिल्हयात तांत्रिक व प्रशासकीय कामावर देखरेख, नियंत्रण ठेवण्यात येऊन आर्थिक बाबतीत तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी देण्यात येते, विभागातील जनतेकडुन तसेच अधिकारी/कर्मचारी यांचेकडुन प्राप्त होणा-या तक्रारीवर मार्गदर्शन देऊन प्रकरणे निकाली काढण्यात येतात.

    (चार) कार्ये पार पाडण्यासाठी ठरविण्यात आलेली मानके -