Error message
Notice : Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc ).
सरळसेवा भरती २०२३
दिनांक- ०३.०९.२०२४ व दि. ०४.०९.२०२४ रोजी पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील पशुधन पर्यवेक्षक या पदासाठी प्रारुप सुधारीत प्रतिक्षा यादी नुसार कागदपत्रे पडताळणीकरिता उमेदवारांना उपस्थित राहणेबाबत कळविण्यात आले होते. परंतु सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवार कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित होते. सदर उमेदवारांना अंतीम संधी देण्यात येत असून सोबत जोडलेल्या यादीनुसार संबंधित उमेदवारांनी दिनांक १२.०९.२०२४ रोजी सकाळी १०.०० वाजता पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे ६७ या कार्यालयामध्ये विहीत कागदपत्रासह पडताळणीसाठी उपस्थित रहावे. जर सदर दिनांकास आपण उपस्थित न राहील्यास आपल्या नावाचा सदर भरती प्रक्रियेत यापूढे विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
*पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची प्रारूप सुधारित प्रतिक्षाधीन यादी - २०२४ प्रसिद्ध करणेबाबत
*पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे यांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत पशुधन पर्यवेक्षक संवर्गाची प्रारूप सुधारित प्रतिक्षाधीन यादी - २०२४ च्या अनुषंगाने कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जाहीर करणेबाबत
* पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गट-क सरळसेवा परिक्षेमध्ये वरिष्ठ लिपीक संवर्गात अंशकालीन या समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या व पशुसंवर्धन विभागाने संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या वरिष्ठ लिपीक संवर्गाच्या परिक्षा निकालामध्ये 45 टक्के जास्त गुणांचा समाविष्ठ असणा-या सर्व अर्हताप्राप्त उमेदवारांना सूचित करण्यात येते की, त्यांचेकडील सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अंशकालीन मुळ प्रमाणपत्रासह (रोजगार व स्वयंरोजगार विभाग यांचे शासन परिपत्रक क्रमांक 3एसई-2003/प्र.क्र. 48/ रोस्वरो-1, मंत्रालय, मुंबई दि. 07.03.2003 नुसार सक्षम प्राधिका-यांने दिलेले अंशकालीन प्रमाणपत्र) व इतर अर्हता विषयक अभिलेखासह दि. 27.08.2024 रोजी सकाळी 10.00 वाजता पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे येथील कामधेनू सभागृह येथे समक्ष उपस्थित राहून अर्हता पडताळणीस्तव मुळ अभिलेख व स्वसाक्षांकीत २ छायांकीत प्रतिसह सादर कराव्यात. सदर दिनांकांस उपस्थित न राहणाऱ्या व सक्षम प्राधिका-यांचे अंशकालीन प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या उमेदवारांच्या नावाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
* पशुसंवर्धन विभागाद्वारे सन २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पदभरती मधील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गाची सुधारीत प्रारुप निवड यादी मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ औरंगाबाद मुळ अर्ज क्र. १७७ /२०२४ मधील निर्देशानुसार प्रसिध्द करणेबाबत
पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा गट-क संवर्गातील भरती -२०२३ प्रारूप प्रतीक्षा यादी सूचना
दि. २६.०५.२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार गट -क संवर्गातील विविध पदांकरिता निवड झालेल्या उमेदवारांची प्रारूप निवड यादी
दि. २६.०५.२०२३ रोजी पशुसंवर्धन विभागाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार गट -क संवर्गातील पदांच्या परिक्षेचा निकाल