You are here
Error message
Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).Left menu
- सरळसेवा भरती २०२३
- महापशुधन एक्सपो
- बर्ड फ्लू
- पशुपालकांसाठी मार्गदर्शिका
- दुधउत्पादन मार्गदर्शिका
- एनसीडीसी
- स्मार्ट प्रकल्प
- राष्ट्रीय पशुधन अभियान
- जीआर/मार्गदर्शक तत्त्वे/परिपत्रके
- लाभार्थ्यांची यादी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
- शासकीय कर्मचाऱ्यांकरिता
- आस्थापना
- निविदा/ईनिविदा
- कायदे आणि नियम
- माहितीचा अधिकार
- कुक्कुट विकास
- योजना आणि धोरणे
- संस्थाची माहिती
- सांख्यिकी माहिती
- महत्वाची लिंक
- भारत सरकार
- महाराष्ट्र शासन
- MLDB
- दुग्धव्यवसाय विकास
- मत्सयव्यवसाय विभाग
- महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद
- जागतिक आरोग्य संघटना
- अन्न व कृषी संघटना
- BAIF
- महाराष्ट्र पशु व मत्स्य शास्त्र विद्यापीठ
- भारतीय पशुवैद्यकीय परिषद
- ए एच अप्लिकेशन
- महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षम प्रकल्प
- DAHD
- NDDB
- INAPF
- Indian Institute of Poultry Research
- पशुधन ऐश्वर्य
- कामधेनु
- सांख्यिकी माहिती
- महाराष्ट्र कृषी स्पर्धाक्षमता प्रकल्प
- जमीन व्यवस्थापन
- माहिती पुस्तिका
- वैरण विकास
यु टूब व्हिडीओ
मा. सचिव महोदय श्री. तुकाराम मुंढे यांचे विभागांच्या अधिकारी यांना पशुसंवर्धनातून शेतकऱ्यांमध्ये उद्योजक निर्माण करणे त्यांचे व पर्यायाने राज्याचे, देशाचे आर्थिक उत्पन्न वाढवणे यासाठी अत्यंत मौलिक मार्गदर्शन
Lumpy Skin Disease
लंपी स्किन डिसीजचे उपचार
- रोगी जनावरे वेगळी ठेवावीत.
- लक्षणांनुसार उपचार करावेत.
- ताप आल्यास ताप कमी होण्याची औषधे व ॲन्टीहिस्टामिनिक्स द्यावीत..
- ५ ते ७ दिवस प्रतिजैवके द्यावीत जेणेकरून इतर जिवाणुजन्य आजार होणार नाहीत.
- अंगावरील सूज कमी होण्यासाठी फ्लुनेक्सिन हायड्रोक्लोराईड सारखी ॲन्टी-इन्फ्लमेटरी औषधे द्यावीत.
- ॲन्टीसेप्टिकसह माश्या व कीटके दूर ठेवणारी मलमे शरीरवर लावण्यासाठी द्यावीत.
- जीवनसत्वे इन्जेक्शन अथवा तोंडावाटे द्यावीत.
- रोगी जनावरांना तोंडातील व्रण भरून येईपर्यंत मऊ खाद्य द्यावे. तसेच, मऊ हिरवे गवत खायला घालावे.
लंपी स्किन डिसीजचेनियंत्रण व प्रतिबंधक उपाय योजनाः-
- बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे.
- कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे.
- रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे.
- डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे. तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.
- रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.रोग प्रादुर्भाव क्षेत्रात स्थानिक बाजार व पशुप्रदर्शने यावर बंदी घालणे.
- बाधित जनावरांचे नमुने घेताना वापरलेली PPE किट्स व इतर साहित्ये यांची जैवसुरक्षा व इतर सर्व बाबींचा विचार करून विल्हेवाट लावणे.
- रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील १० किमी परिघातील जनावरांचे बाजार बंद करणे.
- बाधित जनावरे असलेला परिसर तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व वाहनांचे योग्य ती (उदा. इथर (20%), क्लोरोफॉर्म, फॉर्मेलिन (1%), फिनॉल (2% /15 मिनिटे), सोडियम हायपोक्लोराइट (2-3%) ई.) रसायने वापरून निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
- वळूंमध्ये सदर रोगाची लक्षणे दिसल्यास वीर्य गोळा करू नये. तसेच, बाधित वळू हे रोगमुक्त झाल्यावर त्यांच्या रक्त व वीर्याच्या तपासण्या करून रोगमुक्त असे निदान झाल्यावरच सदर वळू हे नैसर्गिक अथवा कृत्रीम रेतनासाठी वापरावेत.
- एल एस डी रोग़ामुळे दगावलेल्या जनावरांच्या मृत देहाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कमीतकमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून करावी.
Guidline
SrNo | Title | Download |
1. | Advisory | (English) (86KB) |
2. | Leaflet Lsd | (Marathi) (58KB) |
3. | LSD Guidelines | (Marathi) (58KB) |
4. | Guidelines for Sample Collection and Dispatch for Diagnosis of Lumpy Skin Disease |
(English)(429.24 KB ) |
5. | Information for Immediate Notification of Lumpy Skin Disease | (English)(44.04 KB ) |
6. | Comm A H LSD Letter | (Marathi)(1.58 MB ) |
(लम्पि स्किन रोग) घरगुती उपचार (लक्षणे दिसत असतील तर)
- तोंडावाटे दिले जाणारे औषध- 1
- तोंडावाटे दिले जाणारे औषध -2
सामुग्री- खाण्याची पाने- 10, काळे मिरे- 10 ग्रॅम, मिठ - 10 ग्रॅम, गुळ ( सामुग्री प्रती डोस साठी)
खाण्याची पाने, काळे मिरे, मिठ याला एकत्र करुन त्यात गुळ टाकुन पेस्ट बनवा. आजाराची लक्षणे दिसणार्या पशुला पहिल्या दिवशी प्रत्येक 3 तासाने एक डोस खाण्यासाठी दया आणी दुसर्या दिवसा पासून पुढे पशुला 2 आठवडे पर्यंत दिवसातून 3 वेळा डोस दया.
वरील औषधाचा डोस देताना प्रत्येक वेळेस नवीन मिश्रण तयार करावे
सामग्री- लसून- २ पाकळ्या, धने- १०ग्रॅम, जिरे- १० ग्रम, तुळशी पाने- १ मुठ, दालचिनी पाने(तमालपत्र)- १० ग्रम, खाण्याची पाने- ५ नग, लाल कांदे- २ नग, हळद पावडर- १० ग्रम, चिराटाच्या पानाची पावडर- ३० ग्रम, रानतुळस पाने- १ मुठ, कडूनिबाची पाने- १ मुठ, गुळ – १०० ग्रम (सामुग्री प्रति दिवसासाठी-2 डोस ची)
आजाराची लक्षण आजाराची लक्षणे दिसणार्या पशुला पहिल्या दिवशी प्रत्येक 3 तासाने एक डोस खाण्यासाठी दया आणी दुसर्या दिवसा पासून पुढे पशुला 2 आठवडे पर्यंत दिवसातून 2 वेळा डोस दया.
वरील तोंडावाटे दिली जाणारी 2 नि औषधें वरील दिलेल्या माहिती नुसार एकत्रित दयावी. डोस देताना पशुच्या तोंडाचा आतील वरील बाजुस मिश्रण लावल्यास, पशु ते व्यवस्थित चाटुन खाईल)
Measures for prevention of LSD
SrNo | Title | Download |
1. | Measures of prevention of LSD | (Marathi) (86KB) |
Measures for prevention of LSD
SrNo | Title | Download |
1. | LSD daily data till 03.01.2021 | (English) (86KB) |