Theme

Text size

Current Size: 100%

Language

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

This video is about making a Murghas

Murghas Production video 1 (109 MB) (MP4)

This video is about making bag and drum Murghas

Murghas Production in Bag and Drum Video 3 (47.5 MB) (MP4)


flogo1 img

Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त,

औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५ अंतर्गत

१ ते १७ बाबींची माहिती

कलम ४ (१) (b) (i)

कलम ४ (१) (ख) (एक) प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद या कार्यालयाची रचना, कार्य व कर्तव्य यांचा तपशील-

कार्यालयाचे नाव

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद

पत्ता

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद,

खडकेश्वर, औरंगपूरा रोड, औरंगाबाद- ४३१ ००१.

कार्यालय प्रमुख

डॉ. एच. टी. कंगाले (प्रभारी)

शासकीय विभागाचे नाव

पशुसंवर्धन विभाग

कोणत्या मंत्रालयातील खात्याच्या अधिनस्त

कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई-३२.

विशिष्ट कार्ये

प्रशासकीय व तांत्रिक नियंत्रण

विभागाचे ध्येय धोरण

पशुरोगाचे नियंत्रण व पशु आरोग्य

धोरण

 

जनावरांच्या सुधारित जातीची पैदास करणे, दुग्ध उत्पादन वाढविणे, ग्रामीण भागात अद्ययावत पशुवैद्यकीय सेवा पुरविणे या संदर्भात शासनाने व खात्याने घेतलेल्या धोरणांची अंमलबजावणी करणे.

इमारती व जागेचा तपशील

शासकीय इमारत

उपलब्ध सेवा

औरंगाबाद विभागाचे तांत्रिक व प्रशासकीय मार्गदर्शन

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक व वेळा

 

०२४० २३३१३८०

०२४० २३६४३४३

वेळ सोमवार ते शनिवार सकाळी १०.०० ते १७.४५

साप्ताहीक सुटटी व विशिष्ट सेवेसाठी ठरविलेल्या वेळा

रविवार तसेच दुसरा व चौथा शनिवार, शासकीय सुटटया विशिष्ट सेवेसाठी वेळ ठरविलेली नाही.

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयाचे अधिनस्त कार्यालयांची रचना-

 

अ.क्र.

 

विभागाचे नाव

 

जिल्हा

 

अधिनस्त संस्था

 

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद

 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तऔरंगाबाद

 

१. पशुसंवर्धन व जिल्हयाचे राज्यस्तर प्रशासन व तांत्रिक नियंत्रण

 

२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पडेगांव, औरंगाबाद

 

३. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभागिय रोग अन्वेषण प्रयोगशाळा, औरंगाबाद

 

४. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पैठण

 

५. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पैठण

 

६. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, कन्नड

 

७. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, सिल्लोड

 

८. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, गंगापूर

 

९. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, वैजापूर

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तजालना

 

१. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, जालना व जिल्हयाचे राज्यस्तर प्रशासन व तांत्रिक नियंत्रण

 

 

२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जालना

 

 

३. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, बदनापूर

 

 

४. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अंबड

 

 

५. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, भोकरदन

 

 

६. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जाफ्राबाद

 

 

७. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, मंठा

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तबीड

 

१. जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र, पशुवधगृह, बीड व जिल्हयाचे राज्यस्तर प्रशासन व तांत्रिक नियंत्रण

 

 

२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, बीड.

 

 

३. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, अंबंजोगाई

 

 

४. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, केज

 

 

५. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, आष्टी

 

 

६. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, परळी

 

 

७. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, गेवराई

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तपरभणी

१. जिल्हयाचे राज्यस्तर प्रशासन व तांत्रिक नियंत्रण

 

२. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, जिंतूर

 

३. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, गंगाखेड

 

४. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पाथरी

 

५. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, सेलू

 

६. सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, पुर्णा

 

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीजिल्हा परिषदऔरंगाबाद

१. जिल्हयाचे स्थानिक प्रशासन व तांत्रिक नियंत्रण आणि दूरवर कार्यरत पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नियंत्रण

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीजिल्हा परिषदजालना

२. जिल्हयाचे स्थानिक प्रशासन व तांत्रिक नियंत्रण आणि दूरवर कार्यरत पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नियंत्रण

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीजिल्हा परिषदजिल्हा परिषदबीड

३. जिल्हयाचे स्थानिक प्रशासन व तांत्रिक नियंत्रण आणि दूरवर कार्यरत पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नियंत्रण

जिल्हा पशुसंवर्धन अधिकारीजिल्हा परिषदजिल्हा परिषदपरभणी

४. जिल्हयाचे स्थानिक प्रशासन व तांत्रिक नियंत्रण आणि दूरवर कार्यरत पशुवैद्यकीय दवाखान्यांचे नियंत्रण

 

 

 

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील कामकाज खालीलप्रमाणे :-

 

प्रशासन शाखा-कार्यासन प्रमुख :-वरिष्ठ प्रशासन अधिकारीगट अ.

१) प्रशासन संकलन- विभागीय चौकशी, न्यायालयीन प्रकरणे, अधिनस्त कार्यालयाची प्रशासकीय तपासणी व जिल्हा परिषदांना दिलेल्या समायोज्य अनुदानाचे निर्धारण, अधिनस्थ संस्थांकडील अंदाजपत्रक, खर्च व अनुदान बाबतचा व्यवहार, आर्थिक मंजुरी, अग्रिमे इत्यादींबाबत कार्यवाही लेखा१ शाखेकडील कर्मचा-यांकडून करुन घेणे आणि लेखा-२ शाखेकडील आहरण व संवितरण संबंधित कार्य तसेच आर्थिक व्यवहाराच्या सर्व नस्त्या, दैनंदिन व्यवहाराचे रोख-पुस्तक, वेतन व भत्ते आणि इतर आनुषांगिक खर्चे यावरील देयके वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांचेकडे सादर करणे.

२) आस्थापना-१ शाखा :- गट अ व गट ब मधील सर्व राजपत्रित अधिकारी यांचे आस्थापना विषयक कामे, माहितीचा अधिकार अंतर्गत कार्यवाही, रजा मंजूरी, जातपडताळणी, परिविक्षा कालावधी, पदव्युत्तर अभ्यासक्रम, बदल्या व नेमणूका विषयक सर्व कामे, स्थायी नस्ती ठेवणे, नियतकालिक अहवाल पाठविणे आणि खात्याने वेळोवेळी मागविलेली सर्व साधारण माहिती.

तसेच गट ड मधील कर्मचा-यांच्या सरळ सेवा व पदोन्नतीमधील नेमणूका, बिंदू नामावली ठेवणे, सर्व संवर्गातील अधिकारी कर्मचा-यांची वेतननिश्चिती व वेतनवाढी देणे ही अतिरिक्त कामे.

३) आस्थापना-२ शाखा :- कार्यालयातील गट क व गट ड मधील कर्मचा-यांची आस्थापना विषयक कामे, रजा मंजूरी, जातपडताळणी, परिविक्षा कालावधी विषयक सर्व कामे. कर्मचा-यांच्या रिक्त पदांचा अहवाल. टंकलेखन व वरिष्ठांचे कार्यात मदत, आवक / जावक सर्वसाधारण पत्रव्यवहार.

४) लेखा-१ शाखा:- अंदाजपत्रक, भविष्य निर्वाह निधी, लेखा परिक्षण, सेवानिवृत्ती वेतन प्रकरणे, लेखा मेळ, रोकड हाताळणी बाबतचे विशेष वेतन मंजुरी, अधिनस्थ संस्थांकडील अंदाजपत्रक, खर्च व अनुदान बाबतचा पत्रव्यवहार, आर्थिक मंजूरी, अग्रिमे इत्यादींबाबत कार्यवाही.

५) लेखा-२ शाखा:- वेतन देयके, वैद्यकिय खर्चाची प्रतीपुर्ती देयके, पुर्व लेखा परिक्षण प्रस्ताव मंजुर करणे, प्रवासभत्ता व आकस्मिक खर्चाची देयके, भ.नि.नि. देयके तयार करणे, खर्च रकमांचे संवितरण करणे व इतर पत्रव्यवहार, जडसंग्रह व लेखनसामग्री याबाबत कार्यवाही. जडसंग्रह व किरकोळ खरेदी खर्चास मंजूरी देणे.

७) गोपनीय :- सर्व संवर्गातील अधिकारी व कर्मचा-यांचे गोपनीय पत्रव्यवहार. पशुधन विकास अधिका-यांचे व इतर गट ब मधील अधिका-यांचे गोपनीय अभिलेखे ठेवणे. गट क मधील वरिष्ठ सहाय्यक / वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयातील गट क (अधिक्षक वगळून) व ड मधील सर्व कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल ठेवणे. आवक/जावक गोपनीय अहवाल पत्रव्यवहार, श्रुतलेखन विषयक कामे.

 

तांत्रिक शाखा-कार्यासन प्रमुख-पशुधन विकास अधिकारी

 

१) औरंगाबाद विभागातील तांत्रिक मंजुरी विषयक कामे, औषधे खरेदी व द्रवनत्र खरेदी, प्राणिसंरक्षण, वार्षिक प्रशासन अहवाल, एनपीआरई, मासीक प्रगती अहवाल संकलन, संभाव्य दौरा दैनंदिनी मंजुरी देणे, अंडी व पक्षी खरेदी / विक्रीस मंजुरी देणे तसेच अंडयांच्या नुकसानीचे निर्लेखन करणे, कर्ज वसुली, दुग्धस्पर्धा, विविध प्रशिक्षणासाठी अधिकारी / कर्मचारी यांची नामांकने देणे बाबतचा पत्रव्यवहार इत्यादी कामे अधिनस्थ सहाय्यक पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांचे सहाय्याने करुन घेणे.

 

नियोजन शाखा-कार्यासन प्रमुख-सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

१) जिल्हा वार्षिक योजनांचे प्रारुप आराखडे तयार करणे व अंमलबजावणी, योजनेअंतर्गत बांधकामे, स्वेच्छानिधी, शुन्य-बुळकांडी योजना, लाळखुरकत, रोगमुक्त पटटा तसेच वीस कलमी कार्यक्रमांतर्गत ११-अ व ११-ब, पशुधन विकास मंडळ, विभागीय आढावा सभा घेणे, योजनांतर्गत योजनेची आठमाही अंदाजपत्रके तयार करणे व खात्यास अहवाल सादर करणे इत्यादीबाबतचा पत्रव्यवहार तसेच कृत्रिम रेतन व जन्मलेल्या वासरांचे जिल्हा निहाय उदिदष्ठ ठरविणे व आढावा घेणे, लसीकरण, खच्चीकरण, औषधोपचार व प्रशिक्षण व विस्तार या बाबतचा आढावा घेणे व पत्रव्यवहार. विभागातील सर्व तांत्रिक कामावर संनियंत्रण, राष्ट्रीय सहकार विकास निगम, अर्थ सहाय्यीत कुक्कुट प्रकल्पाचा कर्ज वसुली अहवाल आढावा व अर्थसहाय्य प्राप्त करणे बाबत आर्थिक व तांत्रिक दृष्टीने प्रस्तावाची छाननी करणे व खात्यास सादर करणे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अंतर्गत स्वयंरोजगार योजना राबविणे बाबत पत्रव्यवहार.

वैरण विकास शाखा-कार्यासन प्रमुख-वैरण विकास अधिकारी

 

१) वैरण विकास, लघुप्रात्यक्षिके, बी-बियाणे दरपत्रक, खरेदी व पुरवठा, त्याचे वितरणाबाबत पत्रव्यवहार, पशुखादयासाठी मळी पुरवठा बाबत वैरण विकास योजनेचा प्रस्ताव खात्यास सादर करणे, वैरण विकास योजनेची जिल्हा निहाय पाहणी करणे, टंचाई सदृश्य परिस्थिती, अतिवृष्टी बाबत पहाणी व मार्गदर्शन करणे इत्यादिंबाबतचा पत्रव्यवहार. इमारत बांधकाम बाबतचा पत्रव्यवहार अतिरिक्त कार्य म्हणून करणे

 

कलम ४ () (b)(ii)

कलम ४ ()()(दोन)

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद या कार्यालयातील कार्यालय प्रमुख व शाखाधिकारी यांचे अधिकार व कर्तव्यांचा तपशील :-

 

(I) प्रादेशिक सहआयुक्तऔरंगाबाद विभागऔरंगाबाद-

१) कार्यालय प्रमुख व विभागीय प्रमुख म्हणून काम पाहणे.

२) पशुसंवर्धन विभागाचे विभागीय प्रमुख म्हणून संबंधित महसूल विभागातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांवर तांत्रिक, प्रशासकीय व आर्थिक नियंत्रण ठेवणे. विभागाअंतर्गत शासकीय योजनांची व कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे.

३) जिल्हा परिषदे अंतर्गत पशुसंवर्धन विषयक राबविण्यात येणा-या योजना व कार्यक्रम यांवर आर्थिक व तांत्रिक नियंत्रण ठेवणे.

४) विभागाअंतर्गत पशुरोगाचे नियंत्रण व सर्वेक्षण करुन त्या बाबतच्या योजना तयार करणे.

५) विभागातील पशुवैद्यकीय संस्थांची तांत्रिक व प्रशासकिय तपासणी करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे.

६) विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेवर जिल्हा कार्यालयामार्फत तांत्रिक व प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.

७) विभागातील सर्व पशुवैद्यकिय संस्थामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचे आर्थिक व भौतिक बाबींचे नियंत्रण.

८) विभागातील सर्व पशुवैद्यकिय संस्थांमार्फत दिल्या जाणा-या सेवा व सुविधा उत्तम दर्जाची राहिल यावर कटाक्षाने नियंत्रण ठेवणे.

९) शासनाने / खात्याने प्रस्तावित केलेल्या पशुपैदाशीच्या धोरणांची विभागांतर्गत अंमलबजावणी करणे व याअंतर्गत अडीअडचणींचे विभागीय स्तरावरच निराकरण करुन विभागातील क्षेत्रीय संस्था व कर्मचा-यांना मार्गदशन करणे.

१०) विभागांतर्गत योजनांतर्गत-योजना तसेच योजनेत्तर-योजनांच्या अंमलबजावणी साठी आवश्यक अर्थसंकल्पीय अंदाजपत्रके / सुधारीत अंदाजपत्रके तयार करुन वरिष्ठ कार्यालयास सादर करणे. तसेच विभागांतर्गत योजनेत्तर व योजनांतर्गत खर्च व भौतिक साध्यपुर्ती निर्धारित उद्दिष्ठानुसार होण्यासाठी समन्वय व संनियंत्रण ठेवणे.

११) लेखापरिक्षण (महालेखापाल व खात्याचे) तसेच प्रशासकिय / तांत्रिक कामकाजाचे सुयोग्य नियोजन करुन अंमलबजावणी विहित कालमर्यादे मध्येच होण्यासाठी संपुर्ण नियंत्रण व समन्वय ठेवणे.

१२) विभागाचा पशुसंवर्धन विषयक आराखडा तयार करणे व त्यानुसार आवश्यक निधी उपलब्ध करुन घेण्यासाठी पाठपुरावा करणे.

१३) पशुधनातील अनुवंशीक सुधारणा कार्यक्रमाकरीता आवश्यक असलेल्या सर्व निविष्ठांची वेळेवर तसेच पुरेसा पुरवठा सुरळीतपणे होण्यावर सनियंत्रण ठेवणे आणि या निविष्ठांची गुणवत्ता उच्च, विहित मानांकनानुसार राहिल यावर भर देवून नियंत्रण ठेवणे.

१४) विभागांतर्गत आस्थापना विषयक व लेखा विषयक सर्व बाबीवर त्यांना देण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन प्रशासकिय नियंत्रण ठेवणे.

१५) पशुसंवर्धन विभागाच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी पुर्ण दक्षतेने नियंत्रण ठेवणे.

१६) महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा- १९७६ तसेच केंद्र शासनाच्या प्राणी छळ प्रतिबंधक कायदयाच्या अंमलबजावणीवर नियंत्रण ठेवणे.

 

(II) वरिष्ठ प्रशासन अधिकारी-

 

१) कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी म्हणून कामकाज पाहणे, अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते काढणे.

२) प्रशासन शाख्ेतील सर्व कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे, नियंत्रण ठेवणे व देखरेख ठेवणे.

३) औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदांना दिलेल्या समायोज्य अनुदानाचे निर्धारण करणे.

४) औरंगाबाद विभागातील अधिनस्त कार्यालयांना प्रशासकिय मार्गदर्शन करणे.

५) प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना प्रशासकिय निर्णय प्रक्रियेत टिप्पणीवर अभिप्राय नोंदविणे.

६) प्रशासन शाखेतील कर्मचा-यांनी सादर केलेली प्रकरणे आपल्या अभिप्रायासह प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन यांना सादर करणे.

७) कार्यालयातील खर्चावर नियंत्रण ठेवणे, तसेच मासिक खर्च व जमा अहवाल खात्यास सादर करणे.

८) सर्व मासिक, त्रैमासिक, षण्मासिक व वार्षिक नियतकालिक अहवालांचे वेळेवर सादरीकरण होणेबाबत लक्ष ठेवणे.

९) तात्काळ व वेळेवर बंधन असलेल्या बाबींसदर्भात कार्यवाहीचे नियोजन करणे.

 

(III) सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन-

 

१) नियोजन शाखेशी संबंधित कामकाजाची प्रकरणे तपासून आपल्या अभिप्रायासह प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद यांना सादर करणे.

(IV) पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)-

 

१) तांत्रिक शाखेशी संबंधित प्रकरणे तपासून आपल्या अभिप्रयासह प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांना सादर करणे.

२) तांत्रिक शाखेतील कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे, नियंत्रण व देखरेख ठेवणे.

 

अधिनस्त कर्मचा-यांकडील कामाचे स्वरुप व जबाबदारी खालीलप्रमाणे:-

अ.क्र.

 

कामाचे स्वरुप

 

कामासाठी जबाबदार अधिकारी

अभिप्राय

 

 

(प्रशासन विभाग

 

 

 

१. राजपत्रित अधिका-यांविरुध्द, तसेच वर्ग-३ व वर्ग-४ च्या कर्मचा-यांविरुध्दची विभागीय चौकशी / खातेनिहाय चौकशी / तक्रार प्रकरणे यावर कार्यवाही.

२. कार्यालयाची तसेच अधिनस्त कार्यालयाची प्रशासकिय तपासणी व त्यावरील पत्रव्यवहार. लेखा व आस्थापना शाखेतील श्री. पी. एस. डोंगरे व श्री. आर. के. साळवे वरिष्ठ सहाय्यक यांचे मदतीने व वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे नेतृत्वात पुर्ण करणे.

३. कार्यालयातील आस्थापना-१ व २ तसेच सामान्य शाखा यांनी सादर केलेल्या नस्त्यावर अभिप्राय नोंदवून अधिक्षक यांचेकडे सादर करणे.

४. वरिष्ठ प्रशासन अधिकारी यांचे अनुपस्थितीत येणा-या पत्रांची कार्यालयीन डाक पाहणे व वाटपाकरीता खुली करणे.

५. न्यायालयीन प्रकरणे सांभाळणे.

६. औरंगाबाद विभागातील जिल्हा परिषदांना दिलेल्या समायोज्य अनुदानाचे वरिष्ठ सहाय्यक लेखा-१ शाखेसह निर्धारण करणे.

श्रीबी.केजोशीअधिक्षक आस्थापना शाखा

 

 

२.

 

१. विभागातील सर्व राजपत्रित अधिका-यांच्या अनुज्ञेय रजा मंजूर करणे व त्या बाबतचा पत्रव्यवहार .

२. राजपत्रित अधिका-यांची वेतन निश्चिती करणे वेतनवाढ देणे व त्या बाबत पत्रव्यवहार करणे.

३. विभागांतर्गत सर्व जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांची तसेच या कार्यालयातील सर्व राजपत्रित अधिका-यांची सेवापुस्तके व वैयक्तिक नस्त्या जतन करणे व नोंदी ठेवणे.

४. राजपत्रित अधिका-यांचा परिविक्षा कालावधी समाप्त करणे बाबतचा पत्रव्यवहार.

५. अधिका-यांची जातपडताळणी बाबतचा पत्रव्यवहार.

६. राजपत्रित अधिका-यांना मराठी/हिंदी भाषा परिक्षा सूट देणे बाबत पत्रव्यवहार.

७. राजपत्रित अधिकारी यांना वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेवर लेखा परिक्षा सूट देणे बाबतचा पत्रव्यवहार.

८. राजपत्रित अधिकारी यांचे संगणक परिक्षा व सूट बाबत पत्रव्यवहार.

९. अतिरिक्त कार्यभाराचे विशेष वेतन मिळणेसाठीच्या प्रस्तावांवर कार्यवाही.

१०. राजपत्रित अधिकारी यांचे बदली व नियुक्ती विषयक माहिती सादर करणे.

११. राजपत्रित अधिका-यांची प्रतिनियुक्ती बाबत पत्रव्यवहार.

१२. माहितीचा अधिकार बाबत मासिक अहवाल.

१३. मासीक व त्रेमासिक अहवाल सादर करणे. आस्थापना विषयक सर्व पत्रव्यवहार करणे.

१४. गट अ व ब मधील अधिका-यांना आश्वासीत प्रगती योजनेचे फायदे देणे बाबतचा पत्रव्यवहार.

१५. माहितीचा अधिकार अंतर्गत कार्यवाही.

१६. गट ड मधील कर्मचा-यांच्या सरळ सेवा व पदोन्नतीमधील नेमणूका, बिन्दू नामावली ठेवणे.

श्रीपी.एस.डोंगरेवरिष्ठ सहाय्यक आस्थापना शाखा-

 

 

 

१. निवृत्ती वेतन विषयक ना देय/ना मागणी/ ना चौकशी बाबत पत्रव्यवहार करणे व निवृत्ती वेतन विषयक प्रकरणे महालेखापाल यांना सादर करणे.

२. कार्यालयातील वर्ग-४ कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधी लेखे ठेवणे व त्यांचे विभागांतर्गत त्रैमासिक व वार्षिक अहवाल तयार करणे, त्यावरील पत्रव्यवहार करणे.

३. वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे, विभागांतर्गत अंदाजपत्रकांचे संकलन करणे व खात्यास सादर करणे.

४. २२३५- सामाजिक सुरक्षा योजने अंतर्गत मयत कर्मचा-याच्या कुटुंबीयास लाभ देणे बाबत पत्रव्यवहार.

५. विभागातील लेखा मेळा बाबतची माहिती प्राप्त करुन विभागाची एकत्रित माहिती लेखाशिर्षानिहाय तयार करुन खात्यास सादर.

६. खात्याचे व महालेखापालाचे लेखापरिक्षण अहवालाप्रमाणे पुर्तता करुन अनुपालन अहवाल तयार करुन खात्यास सादर करणे. महालेखापालाच्या लेखापालाच्या लेखापरिक्षणातील आक्षेपांची पुर्तता करुन खात्यामार्फत अनुपालन सादर करणे.

७. शासकिय मुद्रांक खरेदी करुन व नोंदवहीत नोंदी घेणे. तसेच कार्यालयीन वापरास देणे.

८. मासिक जमा व खर्च अहवाल खात्यास सादर करणे.

९. भविष्य निर्वाह निधी अग्रीम मंजुर करणे.

श्रीआर.केसाळवेवरिष्ठ सहाय्यक लेखा शाखा-

 

 

 

१. मा.सहआयुक्त पशुसंवर्धन यांनी वेळोवेळी दिलेले श्रुतलेखन घेणे व त्यानुसार पत्र टाईप करणे.

२. मा.सहआयुक्त यांच्या संभाव्य दौ-याविषयी व दैनंदिन मंजुरी बाबत पत्रव्यवहार.

३. कार्यालयातील वर्ग-१ अधिकारी व जिल्हा उपआयुक्त यांचे गोपनीय अहवाल लिहिणे बाबतचा पत्रव्यवहार.

४. कार्यालयातील वर्ग ३ व ४ कर्मचा-यांचे गोपनिय अहवालाची नस्ती हाताळणे बाबतचा पत्रव्यवहार.

५. विभागातील पविअ यांचे गोपनिय अहवाल प्राप्त करुन मूळ खात्यास सादर करणे व दुय्यम प्रत संकलन करणे.

६. गट क मधील वरिष्ठ सहाय्यक / वरिष्ठ लिपिक आणि कार्यालयातील गट क (अधिक्षक वगळून) व ड मधील सर्व कर्मचा-यांचे गोपनिय अहवाल ठेवणे.

७. आवक/जावक गोपनिय अहवालाबाबतचा पत्रव्यवहार.

८. न्यायालयीन प्रतिज्ञापन व इतर दस्तएैवजांचे लेखन करुन देणे.

श्रीडी.एम.पांचाळलघुलेखक लघुलेखक (उच्च श्रेणीगोपनीय शाखा

 

 

 

१. रोख रक्कम हाताळणे. रोख नोंदवही लिहीणे व लेखा विषयक इतर दुय्यम नोंदवहया ठेवणे, स्थायी अग्रीम नोंदवही ठेवणे.

२. कार्यालयातील आकस्मिक खर्चाची /संक्षिप्त देयके / अग्रिमाची देयके/ प्रवास भत्ता देयके तयार करुन कोषागारास सादर करणे.

३. कार्यालयातील अधिकारी/कर्मचा-यांचे वेतन काढणे व त्यांची देयके तयार करणे / पुरवणी वेतन देयके तयार करणे.

४. कार्यालयातील व विभागातील अधिकारी कर्मचारी यांची एक वर्षापेक्षा अधिक कालावधीची परंतु सहा वर्षापेक्षा कमी कालावधीची वेतन व भत्ते देयकास ३९ ब अन्वये मंजुरी देणे.

५. अखर्चित रक्कम नोंदवही ठेवणे.

६. अशासकिय रक्कम नाेंदवही ठेवणे.

७. लेखाविषयक सर्व नोंदवहया ठेवणे व पत्रव्यवहार.

८. संक्षिप्त देयकाची तपशीलवार देयके तयार करणे व महालेखापाल यांना सादर करणे.

९. भविष्य निर्वाह निधी अग्रीम देयके तयार करुन कोषागारास सादर करणे.

१०. वैद्यकिय प्रतीपुर्ती देयकास मंजुरी देणे बाबतचा पत्रव्यवहार.

११. विभागांतर्गत अधिकारी/कर्मचारी यांचे घरबांधणी/संगणक/मोटार सायकल/मोटार वाहन इत्यादी अग्रीमे मंजुरीकरिता प्रतिक्षा यादी ठेवणे व खात्याकडून आलेल्या मंजुरी आदेशा प्रमाणे रकमा संबंधितांना वितरित करणे व त्या बाबतचा इतर पत्रव्यवहार.

श्री.बीआंभोरेवरिष्ठ लिपिक लेखा शाखा-

 

 

 

१. विभागातील व कार्यालयातील वाहन दुरूस्ती/इंधन खरेदीस मंजुरी देणे व कार्योत्तर मंजुरी देणे बाबत सर्व पत्रव्यवहार.

२. विभागातील जडसंग्रह व किरकोळ वस्तु खरेदीस मंजुरी देणे, आवश्यकतेप्रमाणे वस्तूचा पुरवठा मागविणे.

३. शासकिय निवासस्थानांची नोंद ठेवणे, वाटप करणे व त्यासंबंधी पत्रव्यवहार.

४. जडसंग्रहाची व भांडाराची वार्षिक पडताळणी अहवाल मागविणे व त्या बाबत पत्रव्यवहार.

५. वर्ग-४ कर्मचारी यांचे व वाहन चालकांचे गणवेष खरेदी करणे व त्या बाबतचा पत्रव्यवहार.

६. शासकिय लेखन सामग्रीचा पुरवठा करवून घेणे. नविन वर्षाच्या डाय-या व कॅलेंडर्स प्राप्त करणे.

७. संगणक संच, झेरॉक्स यंत्र, विद्युत पुरवठा, शासकीय विश्रामगृह आरक्षण बाबतची व्यवस्था सांभाळणे.

श्रीएन.पीपांडेलिपीक टंकलेखक सामान्य शाखा

 

 

७.

 

१. कार्यालयातील व विभागातील वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचा-यांच्या रजा मंजुरी बाबतचा पत्रव्यवहार.

२. कार्यालयातील वर्ग-४ कर्मचा-यांची वेतन निश्चिती करणे व वेतन वाढी देणे.

३. वर्ग-४ कर्मचा-यांना पदोन्नती/कालबध्द पदोन्नती देणे बाबतचा पत्रव्यवहार.

४. वर्ग-३ कर्मचारी यांची विभागीय वार्षिक ज्येष्ठता सूची तयार करणे व प्रकाशित करणे.

५. वर्ग-४ कर्मचारी यांची विभागीय वार्षिक ज्येष्ठता सूची तयार करणे व प्रकाशित करणे.

६. वर्ग-३ कर्मचा-यांची विभागीय लेखा परिक्षा विषयक पत्रव्यवहार व वयाची ४५ वर्षे पूर्ण झालेल्यांना सूट देणे.

७. वर्ग-४ कर्मचा-यांची जात पडताळणी करुन घेणे.

८. वर्ग-३/४ कर्मचा-यांच्या नियतकालीक बदल्या बाबत पत्रव्यवहार.

९. वर्ग-३/४ कर्मचारी त्रैमासिक सद्य:स्थिती अहवाल व मासिक रिक्त पदे अहवाल तयार करणे व खात्यास सादर करणे.

१०. थकित प्रकरणांचा निपटारा अहवालाबाबत कार्यवाही.

११. वर्ग-३/४ आस्थापना विषयक इतर पत्रव्यवहार.

१२. आलेले टपाल आवक/जावक नोंदवहीत नोंदी घेणे व ते संबंधितांना देणे.

१३. बाहेर पाठविण्याच्या टपालावर जावक क्रमांक टाकून पाठविणे / अर्धशासकीय टपाल संबंधित नोंदवहीत नोंदविणे.

१४. दररोज पाठविलेल्या लखोटयावरील मुद्रांकाची अ नोंदवहीत नोंद घेणे व लेखा ठेवणे.

श्रीएस.बीवाघुलेलिपीक टंकलेखक आस्थापना-

 

 

 

(नियोजन विभाग-

 

 

 

१. जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत सर्व योजनांचे प्रारुप, आराखडे, तसेच आर्थिक व भौतिक साध्य, सर्व योजनांची अंमलबजावणी करणेसाठी क्षेत्रीय अधिका-यांकडे पाठपुरावा करणे. तसेच या संबंधित सर्व मासीक अहवाल व या अंतर्गत येणा-या सर्व योजनांचा पत्रव्यवहार.

२. शुन्य बुळकांडी योजनेअंतर्गत खर्चाचा अहवाल व पाठपुरावा.

३. लाळ खुरकत रोगमुक्त पटटा निर्माण करणे अंतर्गत खर्चाचा अहवाल.

४. वीस कलमी कार्यक्रमांतर्गत ११.अ व ११.ब अहवाल पाठविणे.

५. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयातील मासिक सभा / मा. आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिका-यांच्या अध्यक्षतेखाली होण-या आढावा सभांची पुर्व तयारी.

६. योजनांतर्गत योजनेची चारमाही/आठमाही व दहामाही अंदाजपत्रके तपासणे व आयुक्त कार्यालयास सादर करणे.

७. पंचवार्षिक कृषी, पशुधन व मत्स्य, अवजारे गणना.

८. कार्यक्रम अंदाजपत्रक तयार करणे.

९.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त कार्यालयाची संक्षिप्त टिप्पणी वेळोवेळी तयार करणे.

डॉकेएमइनामदारसहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन (नियोजन शाखा)

 

 

 

(तांत्रिक विभाग-

 

 

 

१. तांत्रिक शाखेशी संबंधित प्रकरणे तपासून आपल्या अभिप्रायासह प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त यांना सादर करणे.

२. तांत्रिक शाखेतील कर्मचा-यांना मार्गदर्शन करणे, नियंत्रण व देखरेख ठेवणे.

डॉएस.एमनेरलकरपशुधन विकास अधिकारी (तांत्रिक)

 

 

१०

 

१. कृत्रिम रेतन व जन्मलेल्या वासरांची शासनाकडून व खात्याकडून आलेल्या उद्दिष्ठाचे जिल्हावार वाटप करणे. त्या अनुषंगाने सर्व पत्रव्यवहार. जिल्हावार साध्याच्या आढावा घेऊन दरमहा प्रगती अहवाल सादर करणे.

२. कृत्रिम रेतन कार्याशी निगडीत सर्व पत्रव्यवहार व जिल्हयातील अडीअडचणी खात्यापुढे मांडणे

३. महत्वाच्या तांत्रिक कामाचा (उदा. लसीकरण, खच्चीकरण, औषधोपचार, प्रशिक्षण व विस्तार कार्यक्रम) आढावा घेणे व काम कमी झाले असल्यास कारणमीमांसा तपासणे.

४. विभागातील सर्व तांत्रिक व प्रशासकिय कामाचे संनियंत्रण अहवाल सादर करणे.

५. प्राणी कल्याणासाठी काम करणा-या संस्थांचे प्रस्ताव पत्रव्यवहार व योग्य पाठपुरावा करणे.

६. प्राणी संरक्षण कायदा अंमलबजावणी बाबत पत्रव्यवहार. कत्तलखान्यावर नियंत्रण, बकरी, बकरी ईद कत्तल.

७. केंद्र पुरस्कृत लाळ खुरकत रोग मुक्त पटटा निर्माण कार्यक्रम व एस्कॅड अंतर्गत लाळ खुरकत प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रम –तांत्रिक नियंत्रण व त्या अनुषंगाने होणारे पत्रव्यवहार.

८. वार्षिक प्रगती अहवाल.

श्रीएच.एमजाधवसहाय्यक पशुधन विकास अधिकारी (तांत्रिक-)

 

 

११

 

१. एन.पी.आर.ई. पाठपुरावा व पत्रव्यवहार,

२. वार्षिक प्रशासन अहवाल.

३. द्रवनत्र वाहतुक प्रस्तावांना मंजुरी.

४. तांत्रिक शाखेचा इतर सर्व पत्रव्यवहार.

५. कार्यालयामार्फत केले जाणारे दर करार.

६. यंत्र व सामग्रीचे निर्लेखन.

७. मासिक प्रगती अहवाल खालीलप्रमाणे-

A सेवाशुल्क जमा रकमेचा मासिक प्रगती अहवाल

B द्रवनत्र व अतिशित रेतमात्रा मासिक प्रगती अहवाल

C पशुसंवर्धन विषयक विविध प्रशिक्षण कार्यक्रम मासिक प्रगती अहवाल.

D कत्तलखाना मासिक प्रगती अहवाल

E एन.पी.आर.ई. मासिक प्रगती अहवाल

F संसर्गजन्य रोगाचा मासिक प्रगती अहवाल

८. दुग्ध स्पर्धा

श्रीएल.एसवैरागेपशुधन पर्यवेक्षक (तांत्रिक-)

 

 

 

१२

 

१. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचा संभाव्य व दौरा दैनंदिनी

२. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र तांत्रिक नियंत्रण त्या अनुषंगाने होणारा पत्रव्यवहार.

३. औरंगाबाद विभागातील अधिकारी यांनी केलेल्या दौ-यास पुर्व परवानगी व कार्योत्तर मंजुरी.

४. पक्षी व साठविलेली अंडी लॉट पध्दतीने विक्री करणेस पुर्व परवानगी व कार्योत्तर मंजुरी प्रस्ताव.

५. ऊबवणी कार्यक्रमात वर्षभरात खराब झालेल्या अंडयाचे नुकसान निर्लेखन प्रस्ताव

६. कुक्कुट कर्ज वसुली प्रस्ताव.

७. मा. प्रादेशिक सहआयुक्त यांचे भेट अहवाल.

८. कार्यालयीन कर्मचारी यांच्या दौरा दैनंदिनी.

९. वाहन चालक दौरा दैनंदिनी.

१०. वाहन चालक अतिकालीक भत्ता मंजूरी.

११. प्रशिक्षण – खात्यामार्फत विविध प्रशिक्षणासाठी अधिकारी/कर्मचारी यांची नामांकने सादर करणे.

१२. राष्ट्रिय सहकार विकास निगम अर्थसहाय्यीत कुक्कुट पालन संस्थांचा कर्ज वसुलीचा आढावा, मासिक अहवाल व अनुषंगीक पत्रव्यवहार.

१३. रा.स.वि.नि. कडून अर्थसहाय्य प्राप्त करुन घ्यावयाचे असल्यास प्राप्त प्रस्तावांची आर्थिक व तांत्रिक दृष्टीने तपासणी करणे व खात्यास सादर करणे.

१४. पशुसंवर्धन खात्यामार्फत स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी, शेळी मेंढी पालन प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव उपलब्ध करुन घेऊन त्यांची तांत्रिक तपासणी करुन प्रस्ताव सादर करणे.

१५. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्रे, कुक्कुट प्रकल्प यांचा विस्तार व आधुनिकी करणासाठी केंद्र शासना मार्फत अनुदान मिळणेसाठीचा पत्रव्यवहार.

१६. सेवांतर्गत संयुक्त उजळणी अभ्यासक्रम.

१७. कुक्कुट प्रक्षेत्रावरील विविध मंजूरी व प्रस्ताव.

१८. महाराष्ट्र पशुधन विकास मंडळा अंतर्गत सुरुवाती पासून निघालेले शासन निर्णय व त्या अनुषंगीक पत्रव्यवहार.

१९. औषधे खरेदी-विभागातील औषधे खरेदी प्रस्तावांना मंजुरी. औषधे खरेदी भावबद करार व त्या अनुषंगाने पत्रव्यवहार.

२०. केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमानाने वेळोवेळी मंजूर झालेल्या योजनांचे प्राप्त प्रस्तावांचे अंमलबजावणी पत्रव्यवहारांबाबत.

श्रीएसएनससानेपशुधन पर्यवेक्षकतांत्रिक-

 

 

 

(वैरण विकास-

 

 

१३

 

१. वैरण विकास- वैरण लघुप्रात्यक्षिकाची बियाणे वितरण व त्या बाबतचा पत्रव्यवहार व अहवाल, जिल्हा स्तरावर प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन करणे.

२. पशुखाद्याबाबतचा पत्रव्यवहार.

३. पशुखाद्यासाठी मळी पुरवठा करणे बाबतचा पत्रव्यवहार.

४. वैरण विकास योजनांतर्गत केंद्र शासनास प्रस्ताव सादर करणे.

५. बि-बियाणे दरपत्रक खरेदी व पुरवठा.

६. वैरण विकास योजने अंतर्गत जिल्हा स्तरावरील योजनांची पाहणी करणे.

७. टंचाई सदृश्य परिस्थिती बाबतचा पत्रव्यवहार पाहणी व मार्गदर्शन करणे.

८. अतिवृष्टी बाबत पत्रव्यवहार.

९. इमारत परिरक्षण व शासकीय जमीन याबाबतचा पत्रव्यवहार.

१०. स्वेच्छा निधी व त्या अंतर्गत घ्यावयाची कामे.

श्रीजी.वायदेशपांडेवैरण विकास अधिकारी पद रिक्त.