Theme

Text size

Current Size: 100%

Language

Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

This video is about making a Murghas

Murghas Production video 1 (109 MB) (MP4)

This video is about making bag and drum Murghas

Murghas Production in Bag and Drum Video 3 (47.5 MB) (MP4)


flogo1 img

Toll Free Number : 18002330418

Information of 1-17 Points of Right To Information Act 2005


कलम ४() (बी) ( ११ )

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयातील अनुदान वाटपाचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

कार्यक्रमाचे वा योजनेचे नांव

विविध योजना

लाभधारकांसाठी पात्रतेच्या अटी

शासन निकषानुसार

लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्वअटी

काही नाही

या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपध्दती

 

पात्रता ठरविण्याचे निकष व आवश्यक कागदपत्र

जन्मतारीख दाखला, शिक्षण, शेतकरी असलेबाबत ७/१२ उतारा, वगैरे

या योजनेतून मिळणा-या लाभाचा तपशील

 

अनुदान वाटपाची पध्दत

वस्तू स्वरुपात

अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे

पशुधन विकास अधिकारी, विस्तार पंचायत समिती तालुका

अर्जाबरोबर भरावयाची फी

लागू नाही

अन्य फी

लागू नाही

अर्जाचा नमुना जेथे असा नमुना ठरविला असेल तेथे जर अर्ज को-या कागदावर करुन भरुन भागणार असेल तर त्यावर अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे हेही स्पष्ट करावे.

अर्जाचा नमुना पशुधन विकास अधिकारी विस्तार पंचायत समिती तालुका यांचे कार्यालयामध्ये मिळू शकतो.

सोबत जो़डावयाची काही विशिष्ठ नमुने

लागू नाही

त्या परिशिष्ठाची काही विशिष्ठ नमुना असल्यास तो नमुना

लागू नाही

कार्यवाहीबाबत काही तक्रार असेल तर ती कोणाकडे करायची, त्या अधिका-यांचे पदनाम

.मा.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग मुंबई-६५

उपलब्ध रकमेचा तपशील उदा. तालुका पातळीवर एवढी रक्कम, जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे

 

लाभधारकांची प्रत्येक वर्षागणिक दिलेल्या नमुन्यानुसार यादी

 

उद्दीष्टे ठरविले असल्यास

 

शेरा

 

सदर यादी केवळ नमुने दाखल आहे. योजनानिहाय प्रपत्र स्वतंत्रपणे कार्यालाय उपलब्ध आहे.

 

कलम ४() (बी) ( १२ )

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत अनुदान वाटप कार्यक्रमातील लाभार्थींचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

योजनेचे नांव बर्डफ्लू नुकसानभरपाई / अनुदान

क्र.

लाभधारकाचे संपूर्ण नांव आणि पत्ता

पत्ता

 

दिलेल्या अनुदानाची रक्कम

 

श्री. परशुराम बापू तावडे

नाधवडे

वैभववाडी

२४०००

 

श्री. प्रदिप बापू सारंग

तळेबाजार

देवगड

२००००

 

श्री. अंकुश स्वामीनाथ पाटील

शिरगांव

देवगड

२००००

 

श्री. गजानन शांताराम राणे

गवाणे

देवगड

१४०००

 

श्री. संजय भिकाजा सावंत

वाडोस

कुडाळ

१६००००

 

श्री. केशव रमेश नारकर

नारुर

कुडाळ

५४०००

 

मे. स्वस्तीक फार्म्स,

कुडाळ

कुडाळ

४६२७८६

 

श्री. दिनेश जयचंद्र म्हाडगुत

वाडोस

कुडाळ

३००००

 

श्री. अंकुश रुपाजी म्हाडगुत

वाडोस

कुडाळ

५००००

 

श्री. योगो बाळकृष्ण बेळणेकर

वाडोस

कुडाळ

१२००००

 

सदर यादी केवळ नमुनेदाखल आहे.

 

कलम ४() (बी) ( १३ )

 

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत कोणतीही सवलत, परवाना अथवा अधिकार पत्र मिळालेल्या लाभार्थींच्या

लाभार्थींचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र

परवाना / परवानगी / सवलत यांचा प्रकार

 

लागू नाही

 

 

कलम ४() (बी) ( १४ )

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरुपात उपलब्ध असलेली माहिती दर्शविणारे विवरणपत्र

 

खातेस्तरावर उपलब्ध आहे.

 

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयामध्ये उपलब्ध असलेली माहिती नागरिकांना पुरविण्यासाठी उपलब्ध असलेल्या सुविधा दर्शविणारे विवरणपत्र

सुविधांचा प्रकार

जनतेसाठी राखून ठेवलेल्या भेटीच्या वेळेसंबंधीची माहिती

दररोज दुपारी ०३.०० ते ०५.००

परस्परसंवादी संकेतस्थळाची इंटर अँक्टीव्ह वेबसाईट माहिती

लागू नाही

कॉल सेंटरची माहिती

लागू नाही

अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध सुविधांची माहिती

मागणीनुसार अभिलेख उपलब्ध करुन दिले जातात

कामाच्या तपासणीच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहिती

वरीलप्रमाणे

 

नमुने मिळविण्याच्या संदर्भात उपलब्ध सुविधांची माहिती

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या योजनांबाबतचे सर्व नमुने सहजासहजी संबंधितांना उपलब्ध करुन दिले जात नाही असलेमुळे या करिता विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता नाही.

सुचना फलकाची माहिती

कार्यालयामध्ये सुचनाफलक आहे. सदर सुचना फलकावर सामान्य जनतेच्या माहितीकरिता सुचना लिहिलेल्या असतात. उदा. पावसाळापूर्व लसीकरण, अँस्कॅड अंतर्गत लसीकरण, विविध योजनांतर्गत लाभ देणेकरिता अर्ज सादर करणे.

ग्रंथालयाची माहिती

कार्यालयामध्ये ग्रंथालय उपलब्ध आहे. सदर ग्रंथालयामध्ये शासकीय सेवा नियम विषयक पुस्तके, तसेच काही संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहेत.

चौकशी कक्षाची/खिडकीची अथवा स्वागत कक्षाची माहिती मिळविण्याची सुविधा

लागू नाही

कार्यालयीन काळानंतर संपर्काची सुविधा असल्यास त्याची माहिती

लागू नाही

आपत्कालीन संपर्काची माहिती

पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय कणकवली दुरध्वनी क्रमांक - ०२३६७-२३२१३१

 

कलम ४() (बी) ( १६ )

सिंधुदुर्ग येथील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, सिंधुदुर्ग या कार्यालयाच्या अखत्यारीतील माहिती संदर्भात माहिती अधिकारी, सहायक माहिती अधिकारी आणि अपिलीय प्राधिकारी यांची तपशीलवर माहिती दर्शविणारे विवरणपत्र

शासकीय माहिती अधिकारी

क्र.

पदनिर्देशित जन माहिती अधिकारी

माहिती अधिकारी म्हणून कार्यकक्षा

संपूर्ण पत्ता /दुरध्वनी क्रमांक

इमेल आयडी

अपिलीय

 

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सिंधुदुर्ग

पूर्ण

जिल्हा पसं उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग २२८८०८

ddcsind@rediffmail.com

मा. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग, मुंबई

सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी

क्र.

पदनिर्देशित सहाय्यक जन माहिती अधिकारी

सहायक माहिती अधिकारी म्हणून कार्यकक्षा

संपूर्ण पत्ता दुरध्वनी क्रमांक

 

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन

कार्यालयापुरती मर्यादित

जिल्हा पसं उपायुक्त कार्यालय सिंधुदुर्ग २२८८०८

 

अपिलीय अधिकारी

क्र.

पदनिर्देशित अपिलीय अधिकारी

अपिलीय प्राधिकारी म्हणून त्यांची कार्यकक्षा

ई मेल आयडी

 

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त मुंबई विभाग मुंबई

मुंबई विभाग

rjcahmumbai@mtnl.net.in

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

रायगड जिल्हारायगड

या कार्यालयाची

माहितीचा अधिकार २००५

अंतर्गत १ ते १७ बाबींची माहिती

विवरण पत्र -१

मंत्रालयीन विभाग व त्यांच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालयीन माहिती भरुन

संबधित प्रशासकीय

विभागाकडे पाठवायचे विवरणपत्र

माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कलम ४ प्रमाणे प्रदर्शित करावयाची

माहिती विभागाचे नांव कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, विकास व मत्स्यव्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई

दुय्यम कार्यालयाचे नांव १. आयुक्त पशुसंवर्धन कार्यालय, महाराष्ट्र राज्य पुणे-१

२. प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, मुंबई विभाग, मुंबई ४०००६५

३. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, रायगड – अलिबाग

वेबसाईट तयार करण्यात आली आहे काय – नाही

होय असल्यास, अद्यावत केल्याची तारीख

 

विषय

१) कार्यालयाची रचना कार्य व कर्तव्ये -

कार्यालयाचे नांव जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड – अलिबाग

पत्ता - रामनाथ रोड, तांबोळी हॉस्पीटलच्या जवळ अलिबाग जि. रायगड

कार्यालय प्रमुख जिल्हा पशुसंवर्धन उपआय़ुक्त

शासकीय विभागाचे नांव पशुसंवर्धन विभाग

कार्यक्षेत्र रायगड जिल्हा कार्यानुरुप रायगड जिल्हा विशिष्ठ कार्य

पशुवैद्यकीय व पशुआरोग्य सेवा

विभागाचे ध्येय, धोरम-पशुआरोग्य सेवा/रोग नियंत्रण /

योजनांची अंमलबजावणी / संकरित पशुधन पैदास कार्यक्रम/ वैरणविकास कार्यक्रम

उपलब्ध सेवा - पशुआरोग्य सेवा

संस्थेच्या संरचनात्मक तक्त्यामध्ये कार्यत्राचा तपशील

कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०२१४१/२२८०३६

कार्यालयीन वेळ- सकाळी १०.०० ते १७.४५

साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टी (शासकिय नियमानुसार)

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड (मुख्यालय अलिबाग) या संस्थेचा प्रारुप तक्ता

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त

 

सहायक आयुक्त पशुसंवर्धन अधिक्षक

सहायक पशुधन विकास अधिकारी वरिष्ठ सहायक

पशुधन पर्यवेक्षक वरिष्ठ लिपीक

वाहन चालक कनिष्ठ लिपीक

नाईक / परिचर शिपाई

 

२) अधिकारी व कर्मचा-यांचे अधिकार व कर्तव्य

खात्याच्या पूर्नरचनांतर मंजूर असलेल्या भरलेल्या व रिक्त पदांची कर्तव्ये व जबाबदा-या

(अधिकारी व कर्मचा-यांचे जॉबचार्ट)

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड (अलिबाग)

 

कार्यालय

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त- १ पद (रिक्त)

१) कार्यालय प्रमुख म्हणून असलेल्या सर्व प्रशासकिय व तांत्रिक जबाबदा-या पार पाडणे.

२) अहरण व संवितरण अधिकारी म्हणून लेखा विषयक सर्व कामे पाहणे. सर्व प्रकारची देयके कोषागारातून पारित करुन घेवून प्राप्त आर्थिक तरतुदींचा योग्य विनीयोग करणे.

३) जिल्हा प्रमुख या नात्याने जिल्हयातील सर्व अधिनस्त कार्यालयांवर प्रशासकिय व तांत्रिक नियंत्रण ठेवणे.

त्या अनुषंगाने जिल्हयाअंतर्गत सर्व संस्थांना नियमित भेटी देवून त्यांचे कामाचा आढावा घेणे. त्या मार्गदर्शन कऱणे.

४) वरिष्ठांच्या सभांना हजर राहणे. व त्यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त सुचनांप्रमाणे कार्यवाही करणे.

५) अपिलीय / माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.

 

 

सहायक आयुक्त पशुसंवर्धन (तांत्रिक सहायक ) १ पद (रिक्त)

१) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांचे तांत्रिक सहायक म्हणून दैनंदिन तांत्रिक कार्यालयीन कामकाज पाहणे.

२) तांत्रिक कर्मचा-यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामावर देखरेख ठेवणे, त्यांच्या दैनंदिन कामाचा नियमित आढावा घेणे, व सर्व तांत्रिक कामे वेळेवर पार पाडली जातील याची दक्षता घेणे.

३) जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त यांच्या सुचनांची अंमलबजावणी करणे.

४) माहितीचा अधिकार कायदा २००५ अंतर्गत सहायक माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.

अधिक्षक १ पद (भरलेले)

१) विभागीय चौकशी प्रकरणे , तक्रार प्रकरणे

२) कर्मचा-यांच्या दैनंदिन कार्यालयीन कामावर देखरेख ठेवणे व त्यांना कार्यालयीन कामात मार्गदर्शन करणे.

३) कार्यालयातील लिपीक वर्गीय कर्मचा-यांची टेबल तपासणी करणे व कार्यक्षमता वाढविण्याचे दृष्टीने मार्गदर्शनपर सुचना देणे. कार्यालयीन कामातील त्रूटींबाबत मार्गदर्शन करणे.

४) कर्मचा-याकडून साप्ताहिक कार्यविवरण गोषवारा प्राप्त करुन संकलीत करुन कार्यालय प्रमुखांचे अवलोकार्थ सादर करणे.

५) जिल्हयांतर्गत संस्थांची प्रशासकिय तपासणी करणे.

६) कार्यालय प्रमुखांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे.

७) हजेरीपट उशीराचे हजेरीपट तपासणी.

८) अर्ध शासकिय पत्र नोंदवही ठेवणे.

९) कार्यालयीन परिपत्रके सूचना पत्रके मसुदा सादर करणे.

१०) कार्यालयीन कामाचे वाटप फरचाटप करणे.

११) दैनंदिन टपाल अवलोकन करुन चिन्हांकीत करणे.

१२) शासकिय कार्यक्रम साजरा करणे.

१३) वरिष्ठांनी सोपविलेली इतर कामे.

 

वरिष्ठ सहायक १ पद (भरलेले)

१) सर्व प्रकारची देयके (वेतन देयके / प्रवास देयके / आकस्मिक खर्चाची देयके / विविधी अग्रीमाची देयके इ.)

२) रोख वही / स्थायी अग्रीम नोंदवही लिहीणे व अद्यावत ठेवणे. तसेच लेखा विषयक नोंदवहया परिपुर्ण करणे.

३) अर्थसंकल्प / सुधारित अंदाजपत्रके (सर्व) / विनियोजन लेखे इ. तयार करणे व जिल्हयातील सर्व संस्थाची अंदाजपत्रके वरिष्ठांना सादर करणे व त्याबाबतचा पत्रव्यवहार.

४) वर्ग -४ कर्मचा-यांचे भविष्य निर्वाह निधीचे लेखे - बृहतपत्रक अद्यावत ठेवणे व त्याबाबतचे वार्षिक लेखे अधिनस्त कार्यालयासह एकत्रिक करुन सादर करणे.

५) कार्यालयाची मासिक खर्चाची विवरणपत्रे तयार करणे. कॅशप्लो अहवाल सादर करणे व खर्चमेळ पत्रव्यवहार.

६) भविष्य निर्वाह निधी परतावा / वापरतावा अग्रीम मंजूरीचे प्रकरणे.

७) वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती मंजूर करणे व वरिष्ठांना सादर करणे.

८) अल्पबचत गुंतवणुक अहवाल सादर करणे व पत्रव्यवहार.

९) कर्मचा-यांना घरबांधणी / वाहन खरेदी / संगणक खरेदीसाठी अग्रीम मंजूरी बाबत अर्ज सादर करणे व त्या अनुषंगिक पत्रव्यवहार.

१०) जमानत बंधपत्र प्राप्त करणे वैद्यता पडताळणी करुन घेणे.

११) आकस्मिक खर्चाचक देयके प्रतिस्वाक्षरी करुन पाठविणे

१२) संक्षिप्त देयकांवर काढलेल्या रकमांची एम.पी.डी.सी. बिले तयार करणे व त्याअनुषंगीक पत्रव्यवहार

१३) शासकीय डाक मुद्रांक नोंदवही ब (साठा नोंदवही) अद्यावत ठेवणे.

१४) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली सर्व कामे करणे.

 

वरिष्ठ लिपीक (२) पदे (लेखा विभाग)

-------------------------

वरिष्ठ लिपीक (१) जिल्हा कार्यालय (१ पद रिक्त)

१) लेखा परिक्षण- खात्याकडील व महालेखापाल यांचे कडील लेखापरिक्षण अहवालाचे अनुपालन सादर करणे व अनुषंगीक सर्व पत्रव्यवहार

२) प्रलंबित लेखा परिक्षण अहवालांची- परिच्छेदांची माहिती दर्शविणारी नोंदवही अद्यावत ठेवणे.

३) अधिनस्त कार्यालयाकडून प्राप्त होणा-या लेखापरिक्षण अनुपालनावर नियंत्रण अधिका-यांचे अभिप्राय नमद करणए व त्या अनुषंगाने अनुपालनाची छाननी व तपासणी करणे (महालेखापालाचे / खात्याचे)

४) अधिनस्त कार्यालयाकडून प्राप्त होणारी मासिक खर्चाची विवरणपत्रे तपासून एकत्रित करुन खात्यास व वरिष्ठांना सादर करणे. खर्चमेळ बाबतचा पत्रव्यवहार करणे.

५) गट विमा योजना विषयाचा पत्रव्यवहरा - नोंदवही परिपूर्ण ठेवणे अंतिम प्रदानाबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करणे.

६) स्टेशनरी / छापील प्रमाणपत्र बाबतचे मागणी पत्रके तयार करुन चर्णी रोड / येरवडा कारागृह मुद्रणालयाकडे मंजूरी साठी सादर करणे त्याचा पाठपुरावा करणे. प्राप्त स्टेशनरी / प्रपत्रांची नोंदवहीत नोंद घेणे.

७) जुने अभिलेके वर्गीकरण करुन जतन करणे बाबत उचित कार्यवाही करणे.

८) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली कामे पार पाडणे.

 

कनिष्ठ लिपीक (२) पदे

कनिष्ठ लिपीक (सर्वसाधारण विभाग)

 

१) आस्थापना (पसं.१ (२) व लेखा (पसं-२ (१) यांना सहायक म्हणून काम करणे.

२) भांडार पडताळणी अहवाल अनुपालन सादर करणे व अनुषंगीक पत्रव्यवहार

३) ग्रंथालय नोंदवही अदयावत ठेवणे व त्यानुसार ग्रथालयातील सर्व पुस्तके जतन करणे

४) चतुर्थ श्रेणी कर्मचारी / वाहन चालक यांना गणवेष पुरवठा व पत्रव्यवहार.

५) कोरी पावती पुस्तके हिशोब व त्याबाबतची नोंदवही अद्यावत ठेवणे.

६) शासकीय डाक मुद्रांक नोंदवही अ अद्यावत ठेवणे तिकिटांच्या वापरावर नियंत्रण ठेवणे व अचूक हिशोब ठेवणे.

७) जुने अभिलेखे वर्गीकरण करणे जतन करणे बाबतच्या कामात वरिष्ठ लिपीक पसं२ (२) यांना मदत करणे.

८) संगणकावर काम करणे. दिलेला पत्रव्यवहार टंकलिखीत करुन देणे व फॅक्स, इमेल पाठविणे बाबतची कामे पार पाडणे.

९) वरिष्ठांनी वेळोवेळई सोपविलेली कामे पार पाडणे.

 

कनिष्ठ लिपीक (२) (नोंदणी विभाग)

१) दैनंदिन आवक जावक नोंदवहीत टपालाची नोंद घेणे. आवक टपाल संबंधित कर्मचा-याना त्याच दिवशी वितरीत करणे. व जावक टपाल त्याच दिवशी निर्गमीत करणे.

२) शासकिय डाकमुद्रांकाची वापराची जावक नोंदवही वेळोवेळी नोंद घेणे.़

३) जुने अभिलेखे वर्गाकरण करणे, जतन करणे याबाबतच्या कामांत लिपीक पस२ (२) यांना मदतनीस म्हणून काम करणे.

४) कार्यालयीन टंकलेखनाचे काम करणे.

५) संगणकावर कार्यालयीन कामे करणे.
६) वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

७) कार्यालयीन स्वच्छेतेकडे लक्ष देणे.

 

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड (अलिबाग) यांचे अधिनस्त असलेल्या कार्यालयातील मंजूर भरलेल्या व रिक्त पदांची कर्तव्य व जबाबदा-या

 

(अधिकारी कर्मचारी जॉब चार्ट)

जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पेण जिरायगड.

 

१) पशुधन विकास अधिकारी १ (पद)

१) कार्यालय प्रमुख म्हणुन सर्व तांत्रिक व प्रशासकिय कामांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

२) संस्थेअंतर्गत असलेल्या जिल्हयातील राज्यस्तरीय व जिल्हा परिषद स्तरीय संस्था व उपकेंद्रांना भेटी देवून कृत्रिम रेतनाच्या कामाची पाहणी करणे कृत्रिम रेतन वाढविण्याचे दृष्टीने मार्गदर्शन करणे, कृत्रिम रेतनाच्या कामाचा नियमित आढावा घेणे.

सहायक पशुधन विकास अधिकारी (२) पदे भरलेली

१) जिल्हयातील राज्यस्तरीय व जिल्हा परिषद संस्था व उपकेद्रांना द्रवनत्र पुरवठा नियमित करणे.

२) पुरवठा कंपन्यांकडून द्रवनत्र आणने व कृ.रे. केंद्रांना पुरवठा करणे, विर्य मात्रा पुरवठा करणे.

३) द्रवनत्रपात्रांची योग्य देखभाल करणे.

४) जडसंग्रह नोंदवही अद्यावत ठेवन जडसंग्रहाची नियमित वार्षिक पडताळणी करुन घेणे.

५) निरुपयोगी द्रवनत्रपात्रांचे निर्लेखन करणे व त्याची विल्हेवाट लावणे, इत्यादी संबंधित कामे करणे.

६) द्रवनत्रवाहतुकीच्या निविदांशी संबधीत पत्रव्यवहार करणे.

७) तांत्रिक अहवाल तयार करुन सादर करणे व इतर अनुषंगिक कामे करणे.

८) लिपीकाचे पद मंजूर नसल्यामुळे लेखापक्षिणातील प्रलंबित परिच्छेदांचे अनुपालन तयार करुन माहितीसाठी वरिष्ठांना सादर करणे.

९) कार्यालय प्रमुखांचे सुचनांप्रमाणे वेळोवेळी सांगितलेली कामे पार पाडणे.

३) परिचर (१) पद भरलेले

द्रवनत्र पात्र व द्रवनत्रांची वाहतूक कामी सहायक पशुधन विकास अधिकारी, यांचे सोबत जावून सर्व संस्था व उपकेंद्रांना द्रवनत्र पुरवठा करणे व कार्यालय प्रमुखांच्या सुचनाप्रमाणे सांगितलेली कामे करणे.

४) स्वच्छक (१) पद भरलेले

कार्यालयातील स्वच्छता व दैनंदिन कार्यालयीन काम करणे. परिचर यांचे गैरहजेरीत द्रवनत्र वाहतुकीचे कामा सहायक पशुधन विकास अधिकारी, यांचे समवेत द्रवनत्र पुरवठ्याकरिता जाणे.

 

सहायक पशुधन विकास अधिकारी पदे २ तांत्रिक (जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय)

१) लस मागणी पुरवठा - पत्रव्यवहार.

२) विस्तार, प्रकाशने , प्रदर्शन, कार्यमोहिमा, मेळावे इ.चे आयोजन व पत्रव्यवहार

३) कृत्रिम रेतन/सेवाशुल्क / जन्मलेली वासरे-मासिक अहवाल/कत्तलखाना/साथीच्या रोगाचा अहवाल, मासीक, त्रैमासीक अहवाल व अनुषंगीक पत्रव्यवहार.

४) भारतीय पशुपैदास कायदा-१९८४ /जनावरांचे भाव अहवाल/ मासीक अहवाल.

५) श्वान प्रजनन प्रतिबंधक शस्त्रक्रिया प्रस्ताव संबंधीत पत्रव्यवहार.

६) प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा-१९६० व प्राणी संरक्षण कायदा- १९७६

७) बुळकांडी रोग निर्मृलन अनषंगिक पत्रव्यवहार.

८) कार्यालयाबाहेरील संभाचे इतिवृत्त व पत्रव्यवहार.

९) दौरा दैनंदिनी संभाव्य दौरा कार्यक्रम तयार करणे / कर्मचारी / अधिका-याच्या दौरा दैनंदिन्या मंजुरीसाठी सादर करणे.

१०) माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती सादर करणे / अर्जदारास उत्तरे पाठविणे / वरिष्ठांना मासिक अहवाल सादर करणे. (अधिक्षकामार्फत)

११) भेटीचे अनुपालन सादर करणे.

१२) वाहन विषयक पत्रव्यवहार / वाहन दुरुस्ती / संगणक दुरुस्ती अनुषंगीक पत्रव्यवहार

१३) दुध मोजणी /दुग्ध स्पर्धा / दुध संस्था/ गोशाळा / पांजरपोळ बाबतचा पत्रव्यवहार.

१४) रोजगार स्वंयरोगजगार / पाणलोट क्षेत्र विकास योजना बाबतचा पत्रव्यवहार.

१५) विश्राम गृह कक्ष आरक्षण / नाहरकत शिफारस प्रमाणपत्र देणे.

१६) बर्डफ्लु बाबतचा संपूर्ण पत्रव्यवहार.

१७) प्रशिक्षण विषयक सर्व पत्रव्यवहार.

१८) वरिष्ठांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे.

१९) कार्यक्रम अंदाजपत्रक बाबतचा अनुषंगीक सर्व पत्रव्यवहार

२०) वार्षिक प्रशासन अहवाल / ए.आय. टारगेत वाटप.

२१) आत्मा योजना / आर.आर.टी. स्थापना / महिला अत्याचार पत्रव्यवहार.

२२) वंधत्व तपासणी एम.एल.डी.बी. अकोला.

 

सहायक पशुधन विकास अधिकारी १ पद भरलेले (एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत)

१) जिल्हा वार्षिक योजना - प्लॅन / ऩॉन प्लॅन मासिक प्रगती अहवाल.

२) योजना अंतर्गत योजनांचे सर्व अर्थसंकल्पीय व सुधारित अंदाजपत्राका बाबतचा सर्व तांत्रिक पत्रव्यवहार.

३) जिल्हा ग्रामीण विकास योजना बाबतचा सर्व पत्रव्यवहार.

४) कार्यालयीन सभाचे आयोजन इतिवृत्त व त्याबाबतचा सर्व पत्रव्यवहार.

५) वैरण विकास योजनेचा सर्व पत्रव्यवहार.

६) वार्षिक प्रशासन अहवाल / ए.आय.टार्गेट वाटप.

७) विधानसभा अधिवेशन / तारांकीत / अतारांकीत प्रश्न / कपात सुचना संबंधिताचा पत्रव्यवहार.

८) जुनी कातकरी योजना / एकात्मिक आदिवाशी विकास योजना बाबतचा सर्व पत्रव्यवहार वसुली बाबतचा पत्रव्यवहार / कुक्कुट पालन कर्ज वसुली पत्रव्यवहार.

९) एम.एल.डी.बी. / द्रवनत्र व द्रवनत्र पात्र विषयक पत्रव्यवहार

१०) शेळी मेंढी / कुक्कुट पालन / वराह पालन / इमू पालन संस्था विषयक अहवाल व पत्रव्यवहार.

११) पशु दवाखाना स्थापना / लघु पशुचिकित्सालय स्थापना / पशुदवाखाना दर्जा वाढ / जात वाढ खानेसुमारी इ. बाबतचा सर्व पत्रव्यवहार.

१२) द्रवनत्र वाहतूक निवीदा बाबतचा सर्व पत्रव्यवहार.

१३) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर सर्व कामे करणे.

१४) डोंगराळ क्षेत्र पश्चिम घाट योजना / पाणलोट क्षेत्र योजना बाबतचा पत्रव्यवहार.

 

पशुधन पर्यवेक्षक १ पद भरलेले (जिल्हा कार्यालय)

१) तांत्रिक तपासणी अहवाल / दुरदर्शन आकाशवाणी / वर्तमानपत्र भाषणे व लेख इत्यादी बाबतचा पत्रव्यवहार.

२) अतिवृष्टी व टंचाईबाबतचा पत्रव्यवहार (मका बियाणे खरेदी बाबत ).

३) अँस्कड योजना अनुषंगिक पत्रव्यवहार व अहवाल.

४) एफ.एम.डी. सी.पी. आय.डी.डी.पी विषयक पत्रव्यवहार.

५) स्वेच्छानिधी बाबतचा अनुषंगीक पत्रव्यवहार व अहवाल.

६) आदर्श गांव / वळू योजना / राष्ट्रीय सहकारी बाबतचा पत्रव्यवहार.

७) इमारती बांधकाम / दुरुस्ती संबंधातील सर्व पत्रव्यवहार / शासकीय जमिनीबाबतचा पत्रव्यवहार.

८) निविदा - कोटेशन बाबतचा सर्व पत्रव्यवहार.

९) औषध खरेदी सर्व प्रकारचा पत्रव्यवहार.

१०) पशुगणना अहवाल व अनुषंगीक पत्रव्यवहार.

११) जडसंग्रह नोंदवही अद्यावत ठेवणे वार्षिक पडताळणी करुन प्रमाणपत्र घेणे अधिनस्त कार्यालयाशी जडसंग्रह विषयक अनुशंगीक पत्रव्यवहार करणे.

१२) वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

१३) किरकोळ वस्तु खरेदी प्रस्ताव तयार करणे अधिनस्त कार्यालयांना मंजूरी देणे.

 

पशुधन पर्यवेक्षक (एकात्मिक पाहणी योजना

१) एकात्मिक पाहणी योजनाअंतर्गत दिलेल्या गावांना भेटी देणे व शासनास आवश्यक ती माहिती गोळा करुन ती शासनास सादर करणे.

२) कोर्ट केसेस हाताळणी व अनुषंगीक पत्रव्यवहार (अधिक्षकामार्फत )

वरिष्ठांनी वेळोवेळी सोपविलेली इतर कामे करणे.

-------------

जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अलिबाग

१) सहायक आयुक्त (पस)

१) जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अलिबाग या संस्थेचा प्रशासकीय व तांत्रिक अधिकारी म्हणून काम पाहणे.

२) माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.

३) कार्यालयाचा आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम करणे.

४) कार्यालयीन दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे.

५) अधिनस्त अधिकारी / कर्मचारी यांच्या जबाबदा-या / कर्तव्ये ठरवून देणे.

६) अधिकारी / कर्मचारी यांच्याकडुन लक्षांक पुर्तिसाठी आराखडा तयार करुन काम करुन घेणे.

७) आर्थिक वर्षात औषधे / हत्यारे व इतर खर्चाती मागणी करणे व उपलब्ध संबंधीत बाबीसाठी खर्च करणे.

८) अधिनस्त अधिकरी / कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणे.

९) कार्यालय इमारत, निवासस्थाने या बाबत प्रमुख या नात्याने देखरेख, देखभाल व दुरुस्ति करुन घेणे.

१०) प्रत्येक महिन्यात कामकाजाचा आढावा घेऊन मासिक व प्रागतिक अहवाल तयार करणे व पाठविणे.

११) संस्थेमध्ये व संस्थेच्या कार्यक्षेत्रात जनावरांना औषधोपचार, कृत्रिम रेतने, लसीकरण, कार्यमोहिमा इ.बाबत नियोजन करणे.

१२) जिल्हामध्ये साथीच्या रोगापासुन जनावरांचे रक्षण होणे साठी वेगवेगळ्या लसमात्रांची मागणी करुन पुरवठा करणे.

२) पशुधन विकास अधिकारी (प्रयोगशाळा)

१) जिल्हा पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अलिबाग येथील प्रयोगशाळा अद्यावत ठेवणे.

२) प्रयोगशाळेसाठी आवश्यक stains/slides/vaeactaiver व इतर साहित्य याची गरजेनुसार मागणी करणे / उपलब्ध करुन घेणे व वापर करणे.

३) प्रयोगशाळा संबंधित रजिस्टर्स व फाईल्स व पुस्तके इत्यादी ताब्यात ठेवणे व अद्यावत ठेवणे.

४) संस्थेच्या कार्यक्षेत्रातील रोगनिदानासाठी नमूने गोळा करणे / पाहणी करणे निष्कर्ष काढून निदान करणे.

५) जिल्हयांमधील इतर संस्थांकडून आलेल्या नमून्यांची तपासणी करणे व जे नमूने DIS ला पाठवायचे त्याबाबत.

६) नमूने आलेले / पाठविलेले त्याबाबत प्राप्त झालेल्या निष्कर्षाची नोंद संबंधित रजिष्टरला घेणे व त्याबाबत वरिष्ठांना अहवाल देणे.

७) Vatewlegal case मध्ये p.m. करुन निदानासाठी नमूने forensiz lab पाठविणे.

८) जिल्हयामध्ये आऊटब्रेक होऊ नये यासाठी संबंधितांना मार्गदर्शन करणे.

९) आऊटब्रेक झाल्यास सदर ठिकाणी भेट देणे व रोगनिदानासाठी नमूने घेणे, DIS ला पाठविणे व संबंधितांना आवश्यक आदेश देणे.

१०) EDR व इतर Lab शी संबंधित कागदपत्रांची नोंद घेणे व MIR तयार करणे.

 

३) पशुधन विकास अधिकारी Medicine

१) दवाखान्यामध्ये आवश्यक औषधांचे मागणीपत्रक तयार करणे मंजूर निधीमधून औषधांची मागणी करणे, पुरवठा तपासणी, औषंधांचे गुणवत्ता प्रमाणपत्राबाबत कार्यवाही करणे इत्यादी.

२) दवाखान्यातील आंतररुग्ण व बाहयरुग्ण तपासणी व उपचार करणे.

३) कृत्रिम रेतन / वांझतपासणी उपचार, कार्यमोहिमा, मेळावे घेणे.

४) मेडीसीन संबंधीत रजिस्टर ताब्यात ठेवणे व अद्यावत करणे.

५) दैनंदिन केस पेपर लिहिणे.

६) मेडीसीन बॅल्नस रजिस्टर अद्यावत ठेवणे मेडीसीन स्टॉक रजिस्टर करणे इ.

७) हेल्थ सर्टिफिकेट पी.एम. सर्टिफिकेट देणे.

८) तांत्रिक कामाच्या लक्षांक पूर्ति साठी प्रयत्न करणे.

९) सेवा शुल्क शासनास जमा करणे, रजिस्टर अद्यावत ठेवणे.

१०) मासिक प्रगती अहवाल तयार करणे.

११) मा. सहायक आयृक्त (प.स.) यांचे सुचनेप्रमाणे इतर कामे करणे.

 

पशुधन विकास अधिकारी - शल्यचिकित्सक

१) शस्त्रक्रियेसाठी साहित्य व हत्यारे मागणी करणे, उपलब्ध हत्यारे अद्यावत ठेवणे.

२) लहान / मोठ्या शस्त्रक्रिया करणे.

३) शस्त्रक्रिये संबंधी रजिस्टर ताब्यात ठेवणे, अद्यावत करणे.

४) O.P.D., TOUR ,WORK CAMP, INFERLITY CAMP मेळावे यामध्ये पशुधन विकास अधिकारी यांना मदत करणे.

 

सहायक पशुधन विकास अधिकारी

१) O.P.D., TOUR ,WORK CAMP, INFERLITY CAMP मेळावे यामध्ये पशुधन विकास अधिकारी यांना मदत करणे.

२) कृत्रिम रेतन करणे.

३) गर्भधारणा तपासणी, वाझंतपासणी उपचार इ. मदत करणे.

४) दवाखान्यातील तांत्रिक कामाचे विविध रजिस्टर, फाईल ताब्यात ठेवणे व अद्यावत करणे.

५) सर्वसाधारण टपालावर मा. सहायक आयुक्त (पस) यांच्या आदर्शनुसार कार्यवाही करणे.

६) सेवाशुल्क जमा कऱणे रजिस्टर अद्यावत ठेवणे व वेळोवेळी विविध कालावधीत भरणा करणे.

७) लस मात्रांची मागणी नोंदवणे, लसमात्रा घेऊन येणे, लसीकरणासाठी प्रयत्न करणे.

८) सहा. आयुक्त (पस) यांनी दिलेल्या आदेशान्वये इतर कामे पार पाडणे.

 

६) पशुधन पर्यवेक्षक

१) तांत्रिक कामात सहायक पविअ यांना मदत करणे.

२) कृत्रिम रेतन करणे.

३) लसीकरण करणे.

४) पशुगणना करणे.

५) तांत्रिक रजिस्टर, फाइल अद्यावत ठेवणे.

 

७) व्रणोपचारक

१) O.P.D., TOUR ,WORK CAMP, INFERLITY CAMP व इतर तांत्रिक कामात वरिष्ठांनामदत करणे.

२) जनावरांच्या जखमा साफ करणे व पविअ यांच्या सुचनेनुसार मलमपटी करणे.

३) दैनंदिन रजिस्टर भरण्यासाठी वरिष्ठांना मदत करणे.

४) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

 

८) परिचारक

१) दैनंदिन कार्यालय स्वच्छता करणे.

२) टपाल पोहच करणे.

३) हत्यारे व अवजारे यांची स्वच्छता ठेवणे.

४) परिसर स्वच्छ ठेवणे.

५) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

 

९) वाहन चालक-

१) शासकीय वाहन चालवणे.

२) शासकीय वाहन स्वच्छ व अद्यावत ठेवणे.

३) वेळोवेळी सर्विसिंग करुन घेणे.

४) गाडीची दुरुस्ती करुन घेणे.

५) लॉग बुक भरुन घेणे.

६) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

 

१०) रात्र पहारेकरी

१) रात्रीचा पहारा करणे.

२) चोरी होणार नाही याची दक्षता घेणे.

३) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

 

११) स्वच्छक

१) दवाखाना स्वच्छ राखणे.

२) टॉयलेट बोसिन साफ करणे.

३) ओ.पे.डि. स्वच्छ ठेवणे.

४) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

 

१२) कनिष्ठ लिपीक -

१) कर्मचारी अधिकारी यांचे पगार व इतर बिले तयार करणे.

२) कॅसबुक भरणे, अद्यावत ठेवणे, कॅश सांभाळणे.

३) सेवापुस्तकात वेळोवेळी नोंदी घेणे मा. आयुक्त यांच्या आदेशानुसार

४) दैनंदिन टपालावर कार्यवाही करणे.

५) ट्रेझरी विषयक कामे पाहणे.

६) सेवा शुल्क जमा करणे.

७) कार्यालयीन आस्थापना व लेखा विषयक कामे पाहणे.

८) वरिष्ठांच्या आदेशानुसार इतर कामे पार पाडणे.

खात्याच्या पुर्नरचनेनंतर नव्याने निर्माण झालेल्या तालुका लघु पशुसर्व चिकित्सालयासाठी मंजूर असलेल्या (भरलेल्या व रिक्त ) पदांची कर्तव्य व जबाबदा-या

१) जिल्हा रायगड

२) ता.ल.प.स.चि. कार्यालयाची संख्या ६ सहा

३) प्रत्येकी मंजूर पदे १) सहायक आयुक्त प.स.१

२) पशुधन विकास अधिकारी १

३) पशुधन पर्यवेक्षक / व्रणोपचारक १

४) वरिष्ठ लिपीक १

५) परिचर १

४) तालुका लघु पशु सर्व चिकित्सालयाची नावे १-पनवेल २-पेण ३-कर्जत ४-खालापूर ५- माणगांव

६- महाड.

 

सहायक आयुक्त प.स.

१) कार्यालयीन प्रमुख म्हणून असलेल्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक जबाबदा-या पार पाडणे.

२) आहरण व सवितरण अधिकारी म्हणून लेखा विषयक सर्व कामे पार पाडणे.

३) प्राप्त आर्थिक तरतूदीचा योग्य विनीयोग करणे.

४) अधिनस्त कर्मचा-यांच्या कामावर नियंत्रण ठेवणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे.

५) वरिष्ठांना सुचना, आदेशांची अंमलबजावणी करणे.

६) वरिष्ठांनी आयोजित केलेल्या सभांना उपस्थित राहणे.

७) माहिती अधिकारी म्हणून काम पहाणे.

 

२) पशुधन विकास अधिकारी-

१) पशुसर्व चिकित्सालयात उपतारार्थ येणा-या जनावरांवर, पशुपक्षांनवर औषधोपचार करणे.
२) कृत्रिम रेतन, खच्चीकरणे, वंधत्व, गर्भधारण तपासणी करणे, शस्त्रक्रिया व शवविच्छेदन, लसीकरण व इथर तांत्रिक कामे पार पाडणे.

३) सहायक आयुक्त यांच्या सुचना, मार्गदर्शनाप्रमाणे तांत्रिक कामे करणे व तांत्रिक सहायक म्हणून काम पाहणे.

४) कार्यमोहीम शिबीराचे आयोजन करणे.

 

३) पशुधन पर्यवेक्षक

१) कार्यालयीन तांत्रिक विषयांची संबंधीत पत्रव्यवहार पार पाडणे.

२) जनावरांना लसीकरण करणे, किरकोळ औषधोपचार करणे.

३) शस्त्रक्रिया, शवविच्छेदन इतर कामात वरिष्ठ अधिका-यांना मदतनीस म्हणून काम करणे.

४) कार्यालय प्रमुखांच्या सुचनांनप्रमाणे इतर सर्व तांत्रिक कामे पार पाडणे.

 

४) वरिष्ठ लिपीक-

१) आस्थापना विषयक सर्व कामे पार पाडणे उदा. अधिकारी कर्मचारी नेमणूका, पदोन्नती, रजा, सेवानिवृती, वेतन निश्चिती, सेवा पुस्तक अद्यावत ठेवणे इ.

२) लेखा विषयक सर्व कामे पार पाडणे उदा. अधिकारी कर्मचारी यांचे वेतन व प्रवासभत्ता देयक, आकस्मित खर्चाची देयके, अग्रीम देयके करुन कोषागारात सादर करणे, अनुषंगिक नोंदवहया राख नोंदवही, बिल नोंदवही इ. लिहुन अद्यावत ठेवणे बॅंक कोषागाराचे काम पाहणे.

३) चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे भविष्य निधी लेखे अद्यावत ठेवणे, हिशोब अचूक ठेवणे.

४) अर्थसंकल्प, सुधारित अंदाजपत्रके सादर करणे, विनियोजन लेखे तयार करणे.

५) प्रशासकीय तपासणी / लेखा परिक्षणीशी संबंधीत प्रलंबित परिच्छेदांवर कार्यवाही करुन अनुपालन सादर करणे.

६) सर्वसाधारण विभागांशी संबंधीत कामे पार पाडणे उदा. आवक-जावक, लेखन सामग्री व छापील प्रमाणे प्रपत्रे यांची मागणीपत्रके तयार करुन सादर करणे. प्राप्त लेखन सामुग्री व प्रमाणपत्रांची नोंदवहीत नोंद घेऊन ती अद्यावत ठेवणे. किरकोळ वस्तूंची नोंदवही अद्यावत ठेवणे.

७) वाहन विषयक पत्रव्यवहार पाहणे.

८) संगणकावर कार्यालयीन कामे करणे.

 

५) परिचर

१) कार्यालयीन स्वच्छता

२) अधिकारी / कर्मचा-यांच्या सूचनांची अंमलबजावणी करणे.

 

खात्याच्या पुर्नरचनेनंतर राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ करिता मंजूर असलेल्या पदांची कर्तव्ये व जबाबदा-या

१) जिल्हा रायगड

२) राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ ची संख्या तालुका महाड-९ माणगांव-६

३) प्रत्येक राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-२ साठी मंजूर असलेल्या पदांची संख्या पशुधन पर्यवेक्षक-१ परिचर-१

 

पशुधन पर्यवेक्षक -

१) दवाखान्यात येणा-या आजारी जनावरांना / पशुपक्षांवर औषधोपचार करणे.

२) कृत्रिम रेतने, लसीकरणे, वंधत्व / गर्भ तपासणी करणे.

३) कार्यक्षेत्रात साथीचे रोग उदभवूनये म्हणून प्रतिबंधात्मक लसीकरण करणे.

४) शेतक-यांना जनावरांच्या आरोग्याबाबत मार्गदर्शन करणेसाठी शिबीर घेणे, कार्यमोहीमांचे आयोजन कऱणे, शासकिय योजना शेतकरी, पशुपालकांपर्यंत पोहचविणे.

५) दवाखान्यातील सर्व पत्रव्यवहार पाहणे, मासिक प्रगती अहवाल सादर करणे, सर्व नोंदवहया अद्यावत ठेवणे इ.

 

२) परिचर

१) दवाखान्याची स्वच्छता ठेवणे.

२) लसीकरण, द्रवनत्र पुरवठा, कृत्रिम रेतन इ. कामात मदतनिस म्हणून काम करणे.

३) वरिष्ठांच्या सुचना / आदेशांची अंमलबजावणी करणे.

 

निर्णय घेण्याची कार्यपध्दतीपर्यवेक्षण व उत्तरदायीत्व प्रणाली

कलम ४ () () (iii)

योजना अधिकारी, कर्तव्य अंमलबजावणी करतानांची कार्यपध्दती

पशुसंवर्धन विषयक राज्य, केंद्रे व इतर योजना राबवित असतांना निर्देशाप्रमाणे कार्यक्रमाची, योजनांची अंमलबजावणी करणेत येते. योजनाअंतर्गत राज्यस्तरीय योजनेत निवडावयाची लाभार्थी घटक पंचायत समिती स्तरावरुन केली जाते. जिल्हा स्तरावर जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त रायगड अलिबाग यांच्या मान्यतेने घटकाला, लाभार्थीला मापदडांनुसार अनुदान, योजनेचा लाभ दिला जातो.

४) कामाचे निकष- जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयामार्फत करण्यात येणारे कामकाज हे पूर्णपणे कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी असल्यामुळे निकष निश्चित नाहीत.

५) कार्य पार पाडण्यासाठी वापरायचे नियम / कायदा -

१) भारतीय पशुवैद्यकीय कायदा १९८४

२) महाराष्ट्र पशुवैद्यकीय कायदा १९७९

३) म.ना.से.नियम

४) मुंबई वित्तीय नियमावली

५) महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम

६) महाराष्ट्र कोषागार नियम

विभागातील कागदपत्रांच्या वर्गवारीचे विवरणपत्र -