Toll Free Number : 18002330418

Additional Director - jointDirector

शुक्रवार, 19 मार्च 2010 06:04
शेवटचा बदल केलेला दिनांक शुक्रवार, 19 मार्च 2010 07:17
 प्रिंट     मागे

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमांमध्ये तयार केलेल (भाग एक, एक-अ आणि एक-

यामध्ये प्रसिध्द केलेले नियम व आदेश यांच्या व्यतिरिक्त) नियम व आदेश

 

कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ६ नोव्हेंबर १९९७

 

भारताचे संविधान,

क्रमांक पसंप्र. १९९५/२५७७१/सीआर-६३/पदुम-१ भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाव्दारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन, आणि यासंबंधीत यापूर्वी करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश किंवा विलेख अधिक्रमित करुन, महाराष्ट्र शासन याव्दारे महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पशुसंवर्धन विभागातील, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ मधील अतिरिक्त संचालक, पशुसंवर्धन सहसंचालक, पशुसंवर्धन, उपसंचालक, पशुसंवर्धन आणि सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन या पदांच्या सेवा प्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहे.

. या नियमास पशुसंवर्धन विभागातील अतिरिक्त संचालक., सहसंचालक उप संचालक, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट अ (सेवा प्रवेश) नियम १९९७ असे म्हणता येईल.

. संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर या नियमात

() पशुसंवर्धन विभाग म्हणजे कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या नियंत्रणाखाली असलेला पशुसंवर्धन विभाग

भाग चार--

महाराष्ट्र शासन राजपत्र असा. नोव्हेंबर ६, १९९७/कार्तिक १५, शके १९१९ (भाग चार-

() आयोग म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग

() पदवी म्हणजे एखाद्या संविधीक विद्यापीठाची पदवी

() शासन म्हणजे महाराष्ट्र शासन.

. पशुसंवर्धन विभागातील अतिरिक्त संचालक, पशुसंवर्धन, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ पदावरील नियुक्ती सहसंचालक, पशुसंवर्धन हे पद धारण करणा-या पशुवैद्यक शास्त्रातील पदवी असलेल्या आणि ज्यांनी सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन/उप संचालक, पशुसंवर्धन/सहसंचालक, पशुसंवर्धन या पदांवरील कमीत कमी १५ वर्षाची एकत्रितपणे नियमीत सेवा केलेल्या व्यक्तीमधून काटोकोर निवडीच्या गाधारे पदोन्नतीव्दारे करण्यात येईल.

. पशुसंवर्धन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ मधील सहसंचालक या पदावरील नियुक्ती, उपसंचालक, पशुसंवर्धन ही पदे धारण करणा-या व्यक्तीमधून काटेकोर निवडीच्या तत्वावर पदोन्नतीव्दारे करण्यात येईल.

परंतु उपसंचालक, पशुसंवर्धन पशुवैद्यक शास्त्र आणि वैरण विकास या संवर्गामधून अनुक्रमे भरण्यात यावयाच्या सहसंचालक, पशुसंवर्धन या पदाची संख्या या दोन्ही संवर्गाला पदोन्नतीच्या सारख्याच संधी उपलब्ध होण्यासाठी या दोन्ही संवर्गाच्या उपसंचालकांच्या मंजूर पदांच्या विद्यमान संख्य़ेच्या आधारावर शासनाकडून ठरविण्यात येईल. तथापि, त्यामध्ये वैरण विकासाच्या संबंधातील सहसंचालकाचे किमान एक पद असेल.

. उप चालक, पशुसंवर्धन या पदावरील नेमणूक महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा गट-अ मधील सहायक संचालकांची पदे व खालील पात्रता धारण करणा-या व्यक्तीमधून काटेकोर निवडीच्या तत्वावर पदोन्नतीव्दारे करण्यात येईल-

() पशुवैद्यक विज्ञान किंवा पशुसंवर्धन स्नातक ही पदवी धारण करणा-या आणि त्या पदावरील किमान तीन वर्षाची नियमित सेवा झालेल्या, आणि

() त्यावेळी अंमलात असलेल्या पशुवैद्यक व्यवसायी अधिनियमान्वये नोंदणी करण्यात आलेल्या नोंदणीकृत पशुवैद्यक व्यवसायीकामधून

. पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक संचालक, महाराष्ट्रर पशुसंवर्धन सेवा गट-अ या पदावरील नेमणूक एकतर

() पशुधन विकास अधिका-याच्या पदावर कार्यरत असून त्या पदावरील किमान तीन वर्षाची नियमित सेवा झालेल्या आणि पशुवैद्यक विज्ञानामधील सेवांतर्गत पदविका किंवा बी.व्ही.एस.सी. पदवा धारण करणा-या व्यक्तीमधून ज्येष्ठताधीन पात्रता या आधारावर एखाद्या योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीव्दारे

() नामनिर्देशनाव्दारे पुढील उमेवारांमधून करण्यात येईल.

(एक) जे आधीच शासनाच्या सेवेत असतील व ज्य़ांचे वय ३५ वर्षापेक्षा अधिक नसेल, आणि

 

(भाग चार-) महाराष्ट्र शासन राजपत्र, असा, नोव्हेंबर ६, १९९७/कार्तिक १५ शके, १९१९

(दोन) पशुवैद्यक शास्त्रातील स्नातकोत्तर पदवी धारण केलेली असेल,

 

(तीन) वरील उपखंड () (दोन) मध्ये नमूद केलेली अर्हता संपादन केल्यानंतर एखाद्या शासकीय विभागातील किंवा औद्योगिक उपक्रमांतील किंवा शासनाने स्थापन केलेली वाणिज्यक संस्था/स्थानिक प्राधिकरण/महामंडळ/मंडळ यातील पशुसंवर्धानातील किमान पाच वर्षाच्या प्रत्यक्ष अनुभव असेल.

परंतु असामान्य अर्हता किंवा अनुभव किंवा दोन्ही असणा-या उमेदवारांची आयोगाने शिफारस केल्यावर, ही वयोमर्यादा शासनाकडून शिथील करण्यात येईल.

() नियम ६ च्या खडं () च्या उपखंड (तीन) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी गट अ मधील सहाय्यक संचालक या पदावर निवड करण्याच्या कोणत्याही टप्प्यावर आयोगाचे असे मत झाले असेल की, मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखून ठेवलेल्या पुरेशा संख्येने उपलब्ध नसतील तर आयोगास अशा निवडीच्या बाबतीत अनुभवाचा कालावधी ४० टक्क्यापर्यंत शिथील करता येईल.

. पदोन्नतीव्दारे आणि नामनिर्दशनाव्दारे सहाय्यक संचालक, पशुसंवर्धन या संवर्गातील तात्पुरत्या व कायम अशा सर्व पदावरील नेमणुका ५०:५० या गुणोत्तरात करण्यात येतील.

. नामनिर्दशनाव्दारे नियम क्रमांक ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नेमणूक केलेली व्यक्ती २ वर्गाच्या परिविक्षा कालावधीवर असेल.

. नियम क्रमांक ३,,५ आणि ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीव्दारे किंवा नामनिर्देशनाव्दारे नेमणूक करण्यात आलेली व्यक्ती, त्याबाबतीत करण्यात आलेल्या नियमानुसार (एक) लेखी, (दोन) हिंदी आणि (तीन) मराठी या विषयातील विभागीय परिक्षा आधीच उत्तीर्ण झालेली नसेल किंवा या परिक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट मिळालेली नसेल तर त्या परीक्षा ती उत्तीर्ण होणे आवश्यक असेल.

१०. नियम ३,,५ आणि ६ मध्ये नमूद करण्यात आलेल्या पदावर नेमणूक करण्यात आलेली व्यक्ती, महाराष्ट्र राज्यात कोठेही बदली होण्यास पात्र असेल.

११. नियम ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नेमणुकीसाठी निवडण्यात आलेल्या व्यक्तीने, त्या पदावर रुजू होण्यापूर्वी महाराष्ट्र पशुवैद्यकीय व्यवसायीक अधिनियम १९७१ अन्वये किंवा नेमणुकीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या इतर कोणत्याही पशुवैद्यकीय व्यावसायीक अधिनियमान्वये तिने स्वतःची पशुवैद्यकीय व्यावसायीक म्हणून नोंदणी करुन घेतलेली नसेल तर तशी स्वतःची नोंदणी करुन घेणे आवश्यक असेल.

महाराष्ट्रचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,

 

 

एस.व्ही.जोशी

शासनाचे सचिव

 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8807223