Toll Free Number : 18002330418

FAQ Sheep and Goat

मंगळवार, 09 मार्च 2010 12:05
शेवटचा बदल केलेला दिनांक मंगळवार, 18 मार्च 2014 06:39
 प्रिंट     मागे

१. महाराष्ट्रातील शेळयांच्या व मेंढयांच्या जाती कोणत्या आहेत?

महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादी, संगमनेरी, कोकण कन्याल आणि सुरती या शेळयांच्या तर दख्खनी व माडग्याळ या मेंढयांच्या प्रमुख जाती आहेत दख्खनी मेंढयांमध्ये संगमनेरी, लोणंद, सांगोला (सोलापूर) आणि कोल्हापूरी हे उपप्रकार आढळतात.

२. पैदाशीकरिता शेळयांची निवड कशी करावी ?

१. जातीची सर्व लक्षणे बरोबर असावीत, शक्यतो त्यांच्यामध्ये उभयगुण (मांस आणि दूध)असावेत.

२. सरासरी वय एक वर्षाचे पुढे, वजन ३०-३२ किलोच्या पुढे असावे

३. मादीचा चेहरा थोडासाही नरासारखा नसावा. अशा मादया द्वीलिंगी असू शकतात व पैदाशीकरिता निरोपयोगी असतात. ४. कपाळ रुंद असावे, मान लांब आणि पातळसर असावी,डोळे तरतरीत असावेत.

५. पाठ मानेपासुन शेपटापर्यंत शक्यतो सरळ असावी, बाक नसावा. पाठीमागुन पाहिल्यावर मांडयात भरपुर अंतर असावे, योनीमार्ग स्वच्छ असावा.

६. कास मोठी आणि लुशलुशित, दोन्ही सड एकाच लांबीचे आणि जाडीचे, दुध काढल्यावर लहान होणारे असावेत.

७. नियमितपणे माजावर येणारी, न उलटणारी, सशक्त, निरोगी, जुळी पिल्ले देणारी, जास्त दुध देणारी, स्वत:च्या करडांविषयी मातृत्वाची भावना असणारी शेळी निवडावी.

३. पैदाशीकरिता कळपामध्ये किती बोकड ठेवावेत ?

शेळयांच्या संख्येच्या तीन ते चार टक्के पैदाशीचे बोकड ठेवावेत म्हणजेच २ ते ३० शेळयांना एक जातीवंत बोकड हे प्रमाण ठेवावे. दर दोन ते तीन वर्षानी कळपातील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.

४. शेळी -मेंढीपालन विषयक प्रशिक्षणाची सुविधा कुठे उपलब्ध आहे?

महामंडळाच्या सर्व प्रक्षेत्रांवर शेळी-मेंढी पालन विषयक पाच दिवसांचे तसेच मुख्यालय पुणे येथे तीन दिवसांचे प्रशिक्षण दर महिन्याला घेतले जाते. याशिवाय राहूरी कृषी विद्यापीठ, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय तसेच काही अशासकीय संस्था जसे निंबकर अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट (NARI) फलटण, रुरल अग्रिकल्चर रिसर्च इन्सिटयुट नारायणराव (RAIN) येथेही सदर प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.

५. शेळयांच्या कोकण कन्याल जातीबद्दल मार्गदर्शन व्हावे.

कोकण कन्याल या जातीच्या शेळया कोकणातील समुद्रकिनारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुङाळ, सावंतवाडी, दोडामार्ग या भागांमध्ये आढळतात. कोकण कन्याल ही जात मुख्यत: मांस उत्पादनासाठी असून १ ते १.५. वर्ष वयाच्या बोकडाचा मटनाचा उतारा ५६.७८ टक्के एवढा आहे. या शेळयांबाबत अधिक माहितीसाठी फलोत्पादन पशुसंवर्धन संशोधन केंद्र निळेली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग किंना विभागप्रमुख पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, डॉ.ब.सा.कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी येथे संपर्क साधावा.

६. वाडेबांधकामासाठी किती जागेची आवश्यकता असते ?

शेळया –बोकड आणि करडांना खालील प्रमाणे बंदिस्त जागा आणि किमान दुप्पट जाळीच्या कुंपणाची मोकळी जागा फिरण्यासाठी आवश्यक आहे.

अ.क्र. वयोगट छताखालील चौ.मी. खुली चौ.मी.
करडे ०.४ ०.८
शेळ्या १ ते १.५ ३.००
पैदाशीचा नर ४.०
गाभण दुभत्या

शेळ्या-मेढयांच्या लसीकरणाविषयी माहिती दयावी.

महिना प्रतिबंधक
एप्रिल आंत्रविषार, घटसर्प
मे पी.पी.आर.
सप्टेंबर मागील वेतात जन्मलेल्या करडांना आंत्रविषार, घटसर्प रोगाचे लसीकरण करणे.
डिसेंबर लाळ्याखुरकूत

८. शेळयांच्या आहारामध्ये अझोला विषयक मार्गदर्शन व्हावे.

अझोला जल शैवालासारखे दिसणारे तरंगते फर्न आहे. सामान्यपणे अझोला उथळ पाण्याच्या जागी उगविते व याची वाढ फार भराभर होते. अझोला हे शेळ्या-मेढयांच्या आहारमध्ये प्रथिने आवश्यक अमिवो अँसिड व जीवनसत्वे स्त्रोत म्हणून वापरता येते. अझोला जनावरांना सुलभतेने पचणारे असून घन आहारात मिसळून किंवा नुसतेच जनावरांना देऊ शकतो. या संदर्भात अधिक माहितीसाठी सहाय्यक प्राध्यापक, पशुविज्ञान व पशुविस्तार विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ. ता. खंडाळा, जि. खंडाळा, जि. सातारा. (फोन नं. ०२१६९-२४४२४३) येथे संपर्क साधावा.

९. शेळयांचे व्यवस्थापन कसे करावे?

किफायतशीर शेळीपालनासाठी व्यवस्थापन :

१. शेळयांच्या संख्येच्या ३ ते ४ टक्के पैदाशीचे बोकड ठेवावे म्हणजेच २५ ते ३० शेळयांना १ बोकड हे प्रमाण ठेवावे.
२. दर दोन वर्षांनी शेळयामधील बोकड बदलावा म्हणजे समरक्त पैदास टाळून सशक्त करडे जन्माला येतील.
३. गाभण / दुधाळ शेळयांना आणि पैदाशीच्या बोकडांना पैदास काळात त्यांच्या वजनानुसार अतिरिक्त हिरवाचारा, वाळलेला चारा व खुराक देण्यांत यावा.
४. सर्व शेळयांना नजिकच्या पशुधन विकास अधिका-यांच्या सल्ल्याने लसीकरण आणि जंतप्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करावा.
५. गोचीड, उवा इत्यादी बाहय किटकांच्या प्रतिबंधासाठी किटकप्रतिबंधक औषध फवारणी करावी.
६. शेळयांचा विमा उतरविण्यांत यावा.
७. एखादी शेळी आजारी/मृत पावल्यास तात्काळ नजिकच्या पशुचिकित्सालयासी संपर्क साधावा. तीची परस्पर विल्हेवाट लावू नये.
८. शेळयासाठी योग्य आकाराचा स्वस्त निवारा करावा आणि त्याची स्वच्छता ठेवण्यांत यावी.
९. शेळयांना दररोज आवश्यकतेनुसार दोनदा स्वच्छ आणि थंड पाणी देण्याची व्यवस्था करावी.

१०. शेळयांच्या आहाराबाबत मार्गदर्शन व्हावे.

हिरवा चारा : ३ ते ४ कि. प्रती शेळी, प्रतिदिन
वाळलेला चारा : ०.७५ ते १.०० किलो
प्रतिशेळी, प्रतिदिन.
संतुलित आहार : २०० ते २५० ग्रॅम प्रतिशेळी, प्रतिदिन.

११. शेळया-मेंढयांचे वय कसे ओळखावे ?

करडास जन्मल्यानंतर पहिल्या आठवडयात समोरच्या दुधी दाताच्या मधल्या तीन जोडया येतात. बाहेरची चौथी जोडी वयाच्या चौथ्या आठवडयात उगवते. कालांतराने करडू जसजसे मोठे होते ज्ञसज्ञसे हे दुधी दात पडतात व त्याजागी कायमचे दात उगवतात. त्याचा कालावधी खालीलप्रमाणे पहिली जोडी - १५ ते १८ महिने दुसरी जोडी- २० ते २५ महिने तिसरी जोडी- २४ ते ३१ महिने चौथी जोडी- २८ ते ३५ महिने या विशिष्ट दातावरुन शेळी- बोकड यांच्या वयाचा अंदाज येतो.

 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8804047