Toll Free Number : 18002330418

FAQs

बुधवार, 17 फ़ेब्रुवारी 2010 14:09
शेवटचा बदल केलेला दिनांक गुरुवार, 13 मे 2010 07:01
 प्रिंट     मागे

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या सौजन्याने, गोधुली प्रश्नमंजूषा

प्रश्न: जनावरांच्या नाकातील रक्त स्त्राव कसा थांबवावा ?
उत्तर: कांदा सुंगणी द्यावी व थंड पाणी डोक्यावर टाकावे.

प्रश्न: जनावरांना खाज आली तर त्यावर काय उपाय ?
उत्तर: लसण कांदा लिंबू गुंजीच्या बिया बाभळीची साल व सिताफळाच्या बिया यांचे समप्रमाणातील मिश्रण रोज चमडीला लावावे.

प्रश्न: शेळ्यांच्या मलमुत्राच्या सुध्दा शेतासाठी उपयोग करता येत असेल ना ?
उत्तर: शेतीचा मगदूर वाढवून जास्त उत्पन्न घेण्यासाठी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगांमध्ये शेळ्यांच्या लेंडयाचे व मुत्राचे खत हे निश्चितच फायदेशीर ठरेल.ही भागात तर १ ते २ रु किलोनी ते विकल्या जाते व त्यावर आणखी काही प्रयोग करुन घरातील कुंड्यामधील व परसबागेसाठी शहरी भागात तर ते ३ ते ५ किलो प्रमाणे विकल्या जाते त्यामुळे हा फायदा आहेच.

प्रश्न: पैदासीच्या बोकडाचे वय किती असावे ?
उत्तर: पैदासीच्या बोकडाचे वय कमीतकमी ३ वर्ष असावे. याचे वजन साधारणतः ३० किलो असावे या बोकडापासून कळपामध्ये २ ते ३ वर्षांपर्यंत पैदास घेण्यात यावी, यानंतर हा बोकड वापरु नये.

प्रश्न: शेळीपालनामुळे शेतक-यांना फायदा कसा होतो ?
उत्तर: कमी देखभाल, कमी प्रतीचे व अत्यल्प खाद्य, त्याची उपलब्धता व शेळ्यांची नैसर्गिक रोगप्रतीकार क्षमता हयामुळे चांगली होणारी पैदास ही शेतक-यांना निश्चितच आर्थिक हातभार लावू शकते.
खाद्य कमी लागत असल्यामुळे अडचणीच्या दिवसात झाडाच्या डहाळ्या आणून टाकल्यास शेळी आपले पोट भरते.
फळांचे साल, उरलेल्या भाज्या वगैरे पूरक म्हणून देता येतात.

प्रश्न: उस्मानाबादी शेळीच्या प्रजातीची माहिती देणार का ?
उत्तर: हया प्रजातीचे दुसरे नाव डेक्कनी देखील आहे. महाराष्ट्राच्या उस्मानाबाद जिल्हयात आढळतात.
आकाराने मोठी असून काळ्या रंगाची असते. परंतू पांढरा-काळा तथा लाल रंगाचे मिश्रण असणा-या देखील आढळतात.
शिंग लांब राहतात. सरासरी १ ते २ किलोग्राम प्रतिदिन दुधाचे उत्पादन असते.
एका वेतात दोन पिलांना जन्म देतात. मांस उत्पादनासाठी अधिक प्रमाणावर वापर करण्यात येते.

प्रश्न: एक बोकड किती शेळ्यांसाठी ठेवावा ?
उत्तर: साधारणपणे २५ शेळ्यामागे १ बोकड असावा.

प्रश्न: जातीवंत पैदासक्षम बोकडाची खरेदी कुठुन करावी. काही पत्ते/ठिकाण दिल्यास फार बरे होईल ?
उत्तर: आपल्या कळपातील बोकड हा अत्यंत महत्वाचा भाग आहे, हे मघाशी आपणाला सांगितलेच आहे. ते मिळण्यासाठी महत्वाच्या संस्थांची नावे.
१) व्यवस्थापक, पुण्यश्लोक अहिल्यादेवा महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळ, मेंढी फार्म, गोखले नगर, पूणे: १३
२) उस्मानाबादी शेळी मार्केटिंग सर्व्हीसेस, भवानी चौक, बायपास रोड, उस्मानाबाद-४१३५०१
३) कृषि विज्ञान केंद्र, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, खापरी, वर्धा रोड, नागपूर
४) निरा व्हॅली जेनेटीक लिमीटेड, पी.बी.नं.२३, लोनंद रोड, फलटण जि. सातारा-४१५५२३

प्रश्न: म्हशीतील माज कसा ओळखावा ?
उत्तर: योनी सैल होते. थोडी थोडी लघवी करते यौनीच्या आजुबाजुला पांढरा क्षार जमा होतो. योनीतुन चिकट सीठ येतो.
दुध उत्पादन कमी होते. भूक मंदावते.

प्रश्न: पावसाळ्यामध्ये जनावरांचे दूध पातळ का होते ?
उत्तर: पावसाळ्यामध्ये जनावरांना फक्त हिरवा चारा देतात. कारण तो मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. कोरडा चारा जनावरांना न मिळाल्यामुळे त्यांचे दुध पातळ होते. कारण दुधातील घट्टपणा हा चा-यातील तंतूमय पदार्थावर अवलंबून असतो.कोरडया/वाळलेल्या चा-यामध्ये तंतूमय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. म्हणून हिरवा व वाळलेला चारा दोनी समान प्रमाणात द्यावा.

प्रश्न: जनावरांना हागवण (अतिसार) लागल्यावर काय उपाय करावे ?
उत्तर: काथ ५० ग्रॅम, खडूची पावडर १०० ग्रॅम, जायफळ २० ग्रॅम यांचे मिश्रण करुन मोठ्या जनावरास २०-३० ग्रॅम आणि लहानास १० ग्रॅम दिवसातून दोन वेळा पाण्यातून पाजावे.

प्रश्न: साधारण होणा-या अपचनावर उपाय काय आहे ?
उत्तर: सुंठ १०० ग्रॅम, ओवा १०० ग्रॅम, काळे मिरे ५० ग्रॅम, हिंग २० ग्रॅम, काळे मिठ ५० ग्रॅम, जीरे ५० ग्रॅम, यांचे मिश्रण ५० ग्रॅम, रोज दोन वेळा गुळातून अथवा कणकेतुन चारावे.

प्रश्न: म्हैस दुध कमी देते. खाद्य कोणते द्यावे ?
उत्तर: भरपुर हिरवा चारा व वाळलेला चारा द्यावा. उदरनिर्वाहासाठी २ किलो संतुलीत आहार व ५ लिटर दुध देणा-या म्हशीला कमीतकमी ३ किलो सुग्रास/अंबोवण द्यावे. लेप्टाडेनच्या ५/१० गोळ्या द्याव्यात. जंताचे औषध द्यावे.

प्रश्न: डोळ्यांचे आजार काय आहेत ?
उत्तर: डोळे दुखणे, पाणी वाहणे, डोळे सुजणे हा त्रास होतो.
उपाय: एक ग्रॅम तुरटी शंभर मिली पाण्यात विरघवळून द्रावणाने डोळे धुवावे अथवा बाळ हिरडे तुपात भाजून त्यात मिठ घालून चूर्ण करुन डोळ्या भोवती लावावे.

प्रश्न: कातडीचे स्वास्थ व केस वाढकरीता उपाय काय आहे ?
उत्तर: १५ दिवस सिसम तेल चमडीला रोज एक वेळेस लावावे.

प्रश्न: जार न पडल्यास काय करावे ?
उत्तर: ३० ते ४० ग्राम मोठया गायीला देणे
१० ते २० ग्रॅम लहान गायीला देणे
कापूस (मुळाची साल (३०), कलोंजी (२०), तांव(१०), हरमल (१०), इश्वरी (२०), या सगळ्यांचे मिश्रण दिवसातून दोनवेळा नियोजित मात्रेत द्यावे.

प्रश्न: पोटफुगीला काय उपाय आहे ?
उत्तर: ५० ग्रॅम मिश्रण मोठया गायीला देणे
२५ ग्रॅम मिश्रण लहान गायीला देणे
ओवा (२०), धणे (१०), जिरे (१५), बदीसोप (१०), हळद (१५), काळे मिठ (३०) यांचे मिश्रण करुन दिवसातून दोन वेळा नियोजित मात्रेत द्यावे. किंवा अर्धा किलो खाते तेलात ३० मिली तारपीन तेल व १० ग्रॅम हिंग टाकून मिश्रण पाजावे.

प्रश्न: पोट गच्च होण्यावरती उपाय काय आहे ?
उत्तर: २० ग्रॅम मिश्रण मोठया गायीला देणे.१५ ग्रॅम मिश्रण लहान गायीला देणे.
हिरडा (३०), आवळा (३०), मुरुडशेंग (१५), सोनामुखी (१५) यांचे मिश्रण करुन दिवसातून दोनवेळा देणे.

प्रश्न: तोंड येणे व तोंडखुरी वर काय उपाय आहे ?
उत्तर: हळद (१५), कोरफड (५), जेष्ठमध (४), अर्जुणसाल (१०), काथ (१०), तुळस (५), गेरु (५०), याचा लेप किंवा तुरटी (१०), हळद (१०), व ठीस (१०), यांचे तेलात मिश्रण करुन तोंडातील आतल्या भागास लेप लावावा.

प्रश्न: खरुज, केस गळणे, पुरळ या सगळ्या त्वचा विकारांवर उपाय काय आहे ?
उत्तर: करंज तेल १० मि.ली., कडुलिंब तेल १० मि.ली., अर्जुन ५ मि.ली., हळद ५ ग्रॅम, कन्हेर ३ ग्रॅम, तूळसतेल ५ मि.ली. हे सगळे एकत्र करुन बाघीत भागावर लावाव्यात.

प्रश्न: मुकामार लागल्यामुळे जनावर लंगडते आहे तर त्यावर उपाय काय आहे ?
उत्तर: निर्गुडी १० मि.ली., निलगिरी तेल १५ मि.ली., कापूर ४ ग्रॅम, लसून ५ ग्रॅम, सुंठ/अद्रक ४ ग्रॅम, टरपेंटाईन तेल २० मि.ली. यांचे मिश्रण बाधीत जागेवर लावावे.

प्रश्न: जनावरांना उसाचे वाढ खाऊ द्यावेत काय ?
उत्तर: उसाच्या वाढयात ऑक्झालेट असते. शरीरातील कॅलशियम सोबत त्याचे संयुग कॅलशियम ऑक्झालेट तयार होऊन शरीराच्या बाहेर टाकल्या जाते.
त्यामुळे शरीरातील कॅलशियम कमी होवून आजार होतात. विशेषतः दुभत्या जनावरांना उसाचे वाढ चारणे टाकावेत.

प्रश्न: जनावरांना साधारणतः किती पाणी लागते ?
उत्तर: वासरांना १-५-६ प्रमाणात लहान जनावरांना २०-३० लिटर पाणी लागते.
जनावरांच्या खाद्यातले कोरडे भागाचे प्रमाण २.५ ते ३ टक्के असायला हवे.
मोठया जनावरांत १-३ हया प्रमाणात मोठया जनावरांना ४०-६० लिटर पाणी लागते. तथा या पाण्याची मात्रा वातावरणातील तापमानावर अवलंबून असते.

प्रश्न: पशुपोषणामध्ये हिरवा चा-याचे महत्व सांगा ?
उत्तर: हिरव्या चा-याने पोट भरल्याचे समाधान होते. प्रथिने, कॅलशिम, जीवनसत्व अ, इ, व्दिदल वनस्पतीच्या हिरव्या चा-यात असतात.अती प्रमाणात हिरवा चारा दिल्यामुळे पोटफुगी होण्याची शक्यता असते.

प्रश्न: ५ लिटर दुध देणा-या संकरीत गाईला किती अंबोवण आणि चारा लागेल ?
उत्तर: ५ किलो अंबवोण भरपूर प्रमाणात व्दिदल वनस्पतीच्या हिरवा चारा आणि वाळलेला चारा द्यावा.

प्रश्न: उदरनिर्वाहाकरिता साधारणतः किती संतुलीत आहार द्यावा ?
उत्तर: उदरनिर्वाहाकरिता जनावरांना १.५ ते २ किलो संतुलीत आहार, हिरवा चारा आणि वाळलेला चारा भरपूर प्रमाणात द्यावा.

प्रश्न: दुधाळ जनावरांना कडबा व हिरवा चारा कोणत्या प्रमाणात द्यावा ?
उत्तर: हिरवा व वाळलेला चारा हवा तेवढा द्यावा. हिरवा चारा खुप प्रमाणात उपलब्ध आहे म्हणून केवळ हिरवा चाराच देवू नये. जनावरांना अपेक्षीत दुध उत्पादनाकरिता हिरवा व वाळलेला चा-याचीही आवश्यकता असते.

प्रश्न: दुधाळ म्हशीची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी किती चारा व पेंढ द्यावी ?
उत्तर: दुधाळ म्हशीला उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तिला संतूलीत आहार उदरनिर्वाहाकरीता आणि म्हैस किती दुध देते त्यानुसार द्यावा. मुबलक प्रमाणात हिरवा आणि वाळलेला चारा द्यावे.
दहा लिटर दुधाळ म्हशीला उदरनिर्वाहाकरीता दोन किलो आणि दुध उत्पादनाकरीता पाच किलो असा सात किलो संतुलीत आहार द्यावा त्या सोबत मुबलक प्रमाणात हिरव्या आणि वाळलेला चारा द्यावा.

प्रश्न: गायीचे/म्हशीचे कृत्रिम रेतन केव्हा करावे ?
उत्तर: गाय व्याल्यानंतर ६० दिवसाचा कालावधी जावू द्यावा व नंतर येणा-या माजाच्या वेळेस गर्भधारणा करावी.
कालवड/वगारीला गर्भधारणा तिचा पहिला माज सोडून दुस-या माजाच्या वेळेस करावे. त्यावेळेस तिच्या गर्भाशयाची योग्य वाढ झालेली असते.कृत्रिम रेतन करताना शक्यतो सकाळ किंवा संध्याकाळीची वेळ निवडावी.

प्रश्न: शेळ्यांचे वय कसे ओळखावे ?
उत्तर: वयाच्या २ १/२ वर्षात ६ दात (३ जोडया) येतात.
वयाच्या २ वर्षात ४ दात (२ जोडया) येतात.
वयाच्या ३-३ १/२ वर्षात ९ दात (४ जोडया) येतात.
हे दुधाचे दात जसे शेळीचे वय वाढते तसे पडून नेहमीचे मोठे दात येतात. साधारणापणे शेळीच्या वयाच्या १ १/२ वर्षात मधली जोडी येते.

प्रश्न: शेळ्यांच्या मलमुत्राचा शेतीसाठी उपयोग करता येतो का ?
उत्तर: काही भागात याचा दर १ ते २ रुपये प्रति किलो आहे.
शहरी भागात तर ते ३ ते ५ रुपये किलो प्रमाणे विकले जाते.
शेतीच्या प्रयोगांमध्ये शेळ्यांच्या लेडयांचे व मुत्राचे खत फायदेशीर ठरेल. घरातील बागबगीचे कुंडयामधील झाडे व परसबागेसाठी याचा उपयोग केला जातो.

प्रश्न: महाराष्ट्राच्या काही भागात शेतक-यांचा कर्जबाजारीपणा नापीकी व त्यामुळे आत्महत्या ही मोठी सामाजिक आपत्ती आहे. यावर शेळीपालन हे उत्तर असू शकते का ?
उत्तर: निश्चितच होवू शकते.कमी प्रतीचे व अत्यल्प खाद्य, त्याची उपलब्धता व शेळयांची नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता यामुळे चांगली होणारी पैदास ही शेतक-यांना निश्चितच आर्थिक हातभार लावू शकते.
खाद्य कमी लागत असल्यामुळे अडचणीच्या दिवसात झाडाच्या डहाळया आणून टाकल्यास शेळी आपले पोट भरते. फळांची साल, उरलेल्या भाज्या वगैरे पूरक म्हणून देता येतात.

प्रश्न: शेळीपालन व्यवसाय म्हणून करता येईल का ?
उत्तर: हो, नक्कीच घरातील गाय म्हैस यांच्या बरोबरच शेतकरी शेळया पाळू शकतो.
एका शेळीपासून वर्षाच्या शेवटी १००० ते १२०० रुपये फायदा होतो.

प्रश्न: गाभण काळात शेळीची काळजी कशी घ्यावी ?
उत्तर: शेळीला उंच सखल भागात चराई करण्यास पाठवू नये, तिला कमीत कमी थकवा येईल अशी काळजी घ्यावी.
गाभ टाकलेल्या शेळ्यांसोबत गाभण शेळीचा संपर्क टाळावा. कळपातील इतर शेळ्यांपासून वेगळे ठेवावे जेणेकरुन तिची निगा व पोषण व्यवस्थित रित्या करता येईल.
स्वच्छ पिण्याचे पाणी मुबलक उपलब्ध राहील याकडे लक्ष द्यावे.
शेळीचे उन्हापासून संरक्षण करावे.
तसेच रात्रीच्या थंडीपासूनही संरक्षण करावे.

प्रश्न: संकरीत गायीचे पोट फुगले आहे. गाय गाभण आहे. पोट काही करुन उतरत नाही काय करावे ?
उत्तर: दुध व गोडेतेल सम प्रमाणात मिसळून तीन दिवस सतत पाजावे.

प्रश्न: गाभण जनावराची काळजी कशी द्यावी ?
उत्तर: जनावरांचा आहार समतोल असावा. शेवटचे दोन महिने खुराकाची मात्रा वाढवावी यामुळे प्रसुती सुखकर होवून नंतरचे धोके टळतील.जनावर इतरांपासून वेगळे बांधावे. शेवटचे दोन महिने दुध काढणे बंद करावे. यामुळे गर्भाची वाढ झपाटयाने होते व कासेला आराम मिळून पुढे भरपूर दूध मिळेल.

प्रश्न: गोचिड व गोमाशी उपाय योजना काय आहे ?
उत्तर: गोचिडांचे समुळ निर्मुलन करावे. यासाठी किटकनाशक द्रावणाची मात्रा शरीरावर फवारण्यासाठी ०.१ ते ०.२ टक्के द्रावणाचा वापर करावा.
गोचिड व गोमाशी गायीचे शरीरावर सापडतात.
यांची अंडी गोठयात, जमिनीत व भिंतीवर भेगांमध्ये असतात.
गोठयातील गोचिडांचे समुळ निर्मुलन करण्यासाठी १ ते २ टक्के किटकनाशक द्रावण फवारावे.

प्रश्न: जनावरातील माज कसा ओळखावा ?
उत्तर: जनावरांवर उडते किंवा दुसरे जनावर उडत असेल तर शांत उभी राहते.
गाय हंबरते व वारंवार लघवी करते.
योनी लालसर होवून सूज येते व काचेसारखा स्त्राव येतो.

प्रश्न: अखाद्य वस्तू खाल्ल्यामुळे जनावरात काय अपाय येतात ?
त्यावर कोणती उपचार पध्दती खात्रीशीर आहे ?
उत्तर: टोकदार वस्तू तोंडाला व पोटाला इजा करतात व पोटात रुतून बसतात. ह्दय, यकृत व फुफ्फुस इ. महत्त्वाच्या अवयवांना इजा करतात. टोचण्यामुळे उदरपोकळीस सूज येऊन पोटदुखी व पोटफुगीची लक्षणे दिसतात.
रवंथ करणा-या जनावरात खाद्याबरोबर अनेक अखाद्य वस्तू पोटात जातात व तेथेच अडकून पडतात उदाहरण रबर, प्लास्टिक, कापड, सुई, खिडा, पिना, पैसे इ. आढळून येतात.
हमखास उपचार शस्त्रक्रिया करुन वस्तू काढून टाकणे. पोटातून तार पुढे जावून जेव्हा ह्दयाला इजा करते तेव्हा मानेची पोळी सुजते. अशावेळी पोटाची शस्त्रक्रिया करणे योग्य नाही.

 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8807243