Toll Free Number : 18002330418

Circulars

गुरुवार, 07 जानेवारी 2010 17:37
शेवटचा बदल केलेला दिनांक गुरुवार, 07 जानेवारी 2010 18:29
 प्रिंट     मागे

आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य पुणे-०१ यांचे कार्यालय

१. केंद्र शासनाचे पत्र क्र.नं. ४३-४६/२००५/एलडीटी (पी)/कृषि भवन, नवी दिल्ली दि. २ मे२००५
१. केद्र शासनाचे पत्र क्र. ४३-५६/२००५/एलडीटी/पी कृषि भवन, नवी दिल्ली ३0 जुन २००५

जा.क्र. कुक्कुटः२/२५५/१०३८/२००६/पसं १३,पुणे ०१ दि. ८/११/२००५

केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील शासकीय कुक्कूट प्रक्षेत्रांना अर्थसहाय्य '' या योजने अंतर्गत केंद्र शासनाची मंजुरी प्राप्त झाली आहे.योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाकडुन प्राप्त मागदर्शक तत्वांतील अनुक्रमांक ५ अन्वये व सदर योजने अंतर्गत प्रकल्प अहवालास अतिरिक्त आयुक्त (पशुधन विकास व रोगनियंत्रण) पशुसंवर्धन आयुक्तालय यांची तांत्रिक मान्यता प्रमाणे करावयाची आहे.

सदर योजना केंद्र शासनाच्या परसातील कोंबडी पालन विकासाचे धोरणाप्रमाणे तयार करण्यात आली असुन देशी कुक्कूट पक्ष्यांच्याऐवजी (CARI approved bird species for Backyard poultry) असे अंतर्भाव करुन त्यातून ग्रामीण भागात अंडी उत्पादन वाढवणे असा एक हेतू आहे.

या योजनेची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी होणे आवश्यक असल्यामुळे त्याकरीता सोबत जोडलेले सहपत्राप्रमाणे सनियंत्रण देखरेख व मुल्यमापन समिती गठित् करण्यात येत आहे. सदर समितीने खालील जबाबदा-या पार पाडायच्या आहेत.

 

१.सदर योजनेअंतर्गत बळकटीकरण / आधुनीकीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी योग्य रीतीने व मुदतीत होणचे दक्षता घेणे व प्रकल्प पूर्ण झाल्यावर अंमलबजावणीचा मुल्यमापन अहवाल आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे.

२.प्रकल्पाकडे उपलब्ध उत्पादन क्षमतेचा पुर्णपणे वापर होईल याकरिता उपाययोजना करणे व देखरेख ठेवणे.

३.प्रकल्पाअंतर्गत् उबवणुकीच्या अंडयाची टक्केवारी व उबवणुकीची क्षमता जास्तीत जास्त राहील याकरिता उपाययोजना करणे व सनियंत्रण तसेच देखरेख ठेवणे.

४.उत्पादीत झालेले एकदिवशीय पक्षी व तलंगा तसेच पैदाशीचे नर इ. विक्री योग्य वयात, योग्य दरात पूर्णपणे विक्री होईल् याची उपाययोजना करणे याकरिता तालुकास्तरीय, विस्तार अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जि. परिषद, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र व सधन कुक्कुट विकास गट मध्ये सनियंत्रण साधावे. आवश्यकतेप्रमाणे मदर युनिट म्हणुन एन.जी. ओ./ सहकारी किंवा कुक्कुट गटाची एजन्सी म्हणुन नेमणुक करणे व त्याचे मदतीने परसातील कोंबडी पालनाचा क्लस्टर पध्दतीने विकास करणे.

५.स्थानीक गरजेप्रमाणे लहान क्षमतेचे उबवणुक उपकरण विकसीत करणे व वापरात आणणेचा प्रक्रियेस प्रोत्साहन देणे.

६.वेळोवेळी कॅरी बरेली अग्रीकल्चरल युनिर्व्हसीटी बेंगलोर व आय.सी.ए. आर. नेटवर्क प्रोजेक्ट हैदराबाद इ.शासकीय संस्थेकडे उपलब्ध नवनवीन विकसीत कुक्कुट पक्ष्यांचा जातीचा आढावा घेणे व आवश्यकतेप्रमाणे बदल करणे.

७.कुक्कुट प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ठरविणे व परसातील कोंबडी पालनाचे प्रशिक्षण लाभार्थिंना व शेतकयांना प्रभावीपणे देता येईल याकरिता उपाययोजना करणे.

८.मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र / सधन कुक्कुट विकास गटाकडे दर करार अंतर्गत पुरवठा झालेले खाद्य गुणवत्तेवर देखरेख ठेवणे.

९.वर्षाअखेर पूढील वर्षाचे एप्रिल अखेर मागील वर्षाकरिता मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र /सधन कुक्कुट विकास गटाचे कामकाज मुल्यमापनाचा अहवाल आयुक्तालयास सादर करणे.

१०.अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन यांना एकदिवशीय पक्षी / तलंगा इ. मागणी व उत्पादन लक्षात घेऊन, सधन कुक्कुट विकास गट / मदर युनिट यांना वरीलप्रमाणे दर्शविण्यात आलेले मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्राशी संलग्न केलेले सधन कुक्कुट विकास गटामध्ये वेळोवेळी तात्पुरता बदल करणेचे अधिकार रहातील.

राज्यस्तरीय सनियंत्रण देखरखे व मुल्यमापनाची जबाबदारी.

वरील १ ते १० प्रमाणे व इतर उपयुक्त बाबींवर सनियंत्रण देखरेख व मुल्यमापन करीता प्रत्येक तिमाहीचे अखेर प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त / मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र / सधन कुक्कुट विकास गट व आवश्यकतेप्रमाणे रोग अन्वेषण विभाग /जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त /जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी व मदर युनिट असल्यास यांची सभा अतिरिक्त आयुक्त (पशुधन विकास व रोगनियंत्रण) यांनी घेणे आवश्यक राहील व महत्वाचे मुद्दे आयुक्तांसमोर सादर करणे अपेक्षित आहे.

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे : ( सधन कुक्कुट विकास गट, सातारा , पेण , पालघर, कोपरगाव, नाशिक सोलापुर)

अ.क्र. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पद कार्यालयाचे नांव तांत्रिक समितीमधील पद
पूणे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे ०७ यांचे कार्यालय,

अध्यक्ष
सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, पुणे यांचे कार्यालय सदस्य
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , पुणे

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , पुणे यांचे कार्यालय खडकी पुणे ०३

सदस्य
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे ०३

मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, खडकी पुणे ०३

फोन (०२०) २५८१५९७४.

सदस्य सचिव

मध्यवर्ती अंडी उबवणी केद्र, औरंगाबाद : (सधन कुक्कुट विकास गट , परभणी , बीड, नांदेड उस्मानाबाद, धुळे )

अ.क्र. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पद कार्यालयाचे नांव तांत्रिक समितीमधील पद
औरंगाबाद प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, औरंगाबाद

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, खडकेश्र्वर, औरंगाबाद, यांचे कार्यालय,

अध्यक्ष

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , औरंगाबाद

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , पुणे यांचे कार्यालय खडकेश्र्वर, औरंगाबाद

सदस्य
सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभागीय रोग अन्वेषण , औरंगाबाद

सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, विभागीय रोग अन्वेषण , औरंगाबाद

सदस्य
सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, औरंगाबाद

सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पडेगांव, औरंगाबाद

फोन (०२४०) २३७०८९६

 

सदस्य सचिव

मध्यवर्ती अंडी उबवणी केद्र, कोल्हापुर : (सधन कुक्कुट विकास गट , तासगाव, सोलापुर),

अ.क्र. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पद कार्यालयाचे नांव तांत्रिक समितीमधील पद
कोल्हापुर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, पुणे ०७ यांचे कार्यालय,

अध्यक्ष

सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण,कोल्हापुर

सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, कोल्हापुर यांचे कार्यालय

सदस्य
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , कोल्हापुर

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , पुणे यांचे कार्यालय मंगलवार पेठ, कोल्हापुर

सदस्य
सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, कोल्हापुर

सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, ताराबाई पार्क, कोल्हापुर

फोन (०२३१) २६५१७२९

 

सदस्य सचिव

मध्यवर्ती अंडी उबवणी केद्र, नागपुर : (सधन कुक्कुट विकास गट , अमरावती , यवतमाळ, अकोला )

अ.क्र. मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र पद कार्यालयाचे नांव तांत्रिक समितीमधील पद
नागपुर प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपुर

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपुर यांचे कार्यालय,

अध्यक्ष

सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, नागपुर

सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, नागपुर यांचे कार्यालय

सदस्य
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , नागपुर

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , नागपुर यांचे कार्यालय

सदस्य
सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नागपूर

सहाय्यक आयुक्त , मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, नागपुर

 

सदस्य सचिव

बदक पैदास केंद्र,वडसा,, गडचिरोली , नागपुर :

अ.क्र. बदक पैदास केंद्र पद कार्यालयाचे नांव तांत्रिक समितीमधील पद
वडसा, गडचिरोली प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपुर

प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त, नागपुर यांचे कार्यालय,

अध्यक्ष

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , गडचिरोली

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त , गडचिरोली

सदस्य
सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, नागपुर

सहाय्यक आयुक्त , विभागीय रोग अन्वेषण, नागपुर यांचे कार्यालय

सदस्य
पशुधन विकास अधिकारी, बदक पैदास केंद्र, वडसा, गडचिरोली

बदक पैदास केंद्र वडसा, गडचिरोली यांचे कार्यालय

 

सदस्य सचिव

स्वाक्षरीत/-
आयुक्त पशुसंवर्धन,
महाराष्ट्र राज्य पुणे ०१

प्रतः माहिती व पूढील कार्यवाहीस्तव

१.मा.प्रधान सचिव,महाराष्ट्र शासन,कृषि पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय मुंबई-३२

२.प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त , पूणे / नागपुर / औरंगाबाद

३.विभागीय रोग अन्वेषण विभाग, पूणे / कोल्हापुर / नागपुर

४.जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, पूणे / कोल्हापूर / नागपूर / औरंगाबाद / गडचिरोली

५.सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, मध्यवर्ती अंडी उबवणी केंद्र, पुणे / कोल्हापुर / औरंगाबाद / नागपुर.

६.पशुधन विकास अधिकारी, बदक पैदास केंद्र, वडसा, गडचिरोली,

 
Disclaimer and Policies Terms and Conditions Accessibility Statement Feedback
© Website owned by Animal Husbandry Department , Government of Maharashtra Valid CSS! Valid XHTML 1.0 Transitional
Total Visitors : 8828669