Error message

Notice: Undefined offset: 1 in counter_get_browser() (line 70 of /var/www/html/mh6-5/sites/all/modules/counter/counter.lib.inc).

Left menu

video

YouTube Video

Toll Free Number : 18002330418


Lumpy Skin Disease


लंपी स्किन डिसीजचे उपचार

 • रोगी जनावरे वेगळी ठेवावीत.
 • लक्षणांनुसार उपचार करावेत.
 • ताप आल्यास ताप कमी होण्याची औषधे व ॲन्टीहिस्टामिनिक्स द्यावीत..
 • ५ ते ७ दिवस प्रतिजैवके द्यावीत जेणेकरून इतर जिवाणुजन्य आजार होणार नाहीत.
 • अंगावरील सूज कमी होण्यासाठी फ्लुनेक्सिन हायड्रोक्लोराईड सारखी ॲन्टी-इन्फ्लमेटरी औषधे द्यावीत.
 • ॲन्टीसेप्टिकसह माश्या व कीटके दूर ठेवणारी मलमे शरीरवर लावण्यासाठी द्यावीत.
 • जीवनसत्वे इन्जेक्शन अथवा तोंडावाटे द्यावीत.
 • रोगी जनावरांना तोंडातील व्रण भरून येईपर्यंत मऊ खाद्य द्यावे. तसेच, मऊ हिरवे गवत खायला घालावे.

लंपी स्किन डिसीजचेनियंत्रण व प्रतिबंधक उपाय योजनाः-

 • बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे.
 • कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे.
 • रोग प्रादुर्भाव झालेल्या गावातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे.
 • डास, गोचिड व तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे. तसेच, निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे.
 • रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारांमध्ये नेण्यास प्रतिबंध करणे.रोग प्रादुर्भाव क्षेत्रात स्थानिक बाजार व पशुप्रदर्शने यावर बंदी घालणे.
 • बाधित जनावरांचे नमुने घेताना वापरलेली PPE किट्स व इतर साहित्ये यांची जैवसुरक्षा व इतर सर्व बाबींचा विचार करून विल्हेवाट लावणे.
 • रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील १० किमी परिघातील जनावरांचे बाजार बंद करणे.
 • बाधित जनावरे असलेला परिसर तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व वाहनांचे योग्य ती (उदा. इथर (20%), क्लोरोफॉर्म, फॉर्मेलिन (1%), फिनॉल (2% /15 मिनिटे), सोडियम हायपोक्लोराइट (2-3%) ई.) रसायने वापरून निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
 • वळूंमध्ये सदर रोगाची लक्षणे दिसल्यास वीर्य गोळा करू नये. तसेच, बाधित वळू हे रोगमुक्त झाल्यावर त्यांच्या रक्त व वीर्याच्या तपासण्या करून रोगमुक्त असे निदान झाल्यावरच सदर वळू हे नैसर्गिक अथवा कृत्रीम रेतनासाठी वापरावेत.
 • एल एस डी रोग़ामुळे दगावलेल्या जनावरांच्या मृत देहाची विल्हेवाट शास्त्रीय पद्धतीने कमीतकमी ८ फूट खोल खड्ड्यात गाडून करावी.
1 / 2

LSD1
2 / 2

LSD2Guidline

SrNo Title Download
1. Advisory PDF icon(English) (86KB)
2. Leaflet Lsd PDF icon(Marathi) (58KB)
3. LSD Guidelines PDF icon(Marathi) (58KB)
4. Guidelines for Sample Collection and
Dispatch for Diagnosis of Lumpy Skin Disease
PDF icon(English)(429.24 KB )
5. Information for Immediate Notification of Lumpy Skin Disease PDF icon(English)(44.04 KB )
6. Comm A H LSD Letter PDF icon(Marathi)(1.58 MB )

(लम्पि स्किन रोग) घरगुती उपचार (लक्षणे दिसत असतील तर)


 • तोंडावाटे दिले जाणारे औषध- 1


 • सामुग्री- खाण्याची पाने- 10, काळे मिरे- 10 ग्रॅम, मिठ - 10 ग्रॅम, गुळ ( सामुग्री प्रती डोस साठी)

  खाण्याची पाने, काळे मिरे, मिठ याला एकत्र करुन त्यात गुळ टाकुन पेस्ट बनवा. आजाराची लक्षणे दिसणार्या पशुला पहिल्या दिवशी प्रत्येक 3 तासाने एक डोस खाण्यासाठी दया आणी दुसर्या दिवसा पासून पुढे पशुला 2 आठवडे पर्यंत दिवसातून 3 वेळा डोस दया.
  वरील औषधाचा डोस देताना प्रत्येक वेळेस नवीन मिश्रण तयार करावे • तोंडावाटे दिले जाणारे औषध -2
 • सामग्री- लसून- २ पाकळ्या, धने- १०ग्रॅम, जिरे- १० ग्रम, तुळशी पाने- १ मुठ, दालचिनी पाने(तमालपत्र)- १० ग्रम, खाण्याची पाने- ५ नग, लाल कांदे- २ नग, हळद पावडर- १० ग्रम, चिराटाच्या पानाची पावडर- ३० ग्रम, रानतुळस पाने- १ मुठ, कडूनिबाची पाने- १ मुठ, गुळ – १०० ग्रम (सामुग्री प्रति दिवसासाठी-2 डोस ची)


  आजाराची लक्षण आजाराची लक्षणे दिसणार्या पशुला पहिल्या दिवशी प्रत्येक 3 तासाने एक डोस खाण्यासाठी दया आणी दुसर्या दिवसा पासून पुढे पशुला 2 आठवडे पर्यंत दिवसातून 2 वेळा डोस दया.


  वरील तोंडावाटे दिली जाणारी 2 नि औषधें वरील दिलेल्या माहिती नुसार एकत्रित दयावी. डोस देताना पशुच्या तोंडाचा आतील वरील बाजुस मिश्रण लावल्यास, पशु ते व्यवस्थित चाटुन खाईल)

Measures for prevention of LSD


SrNo Title Download
1. Measures of prevention of LSD PDF icon(Marathi) (86KB)

Measures for prevention of LSDSrNo Title Download
1. LSD daily data till 03.01.2021 PDF icon(English) (86KB)

Measures for prevention of LSD

SrNo Title Download
1. Notification for LSD PDF icon(Marathi) (86KB)